नमो शेतकरी योजना: ८९ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ₹१७९८.७८ कोटी जमा – जिल्हानिहाय संपूर्ण यादी जाहीर

Namo Shetkari Yojana 8th Installment : राज्यातील ८९ लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेचा ८वा हप्ता जमा झाला आहे. एकूण ₹१७९८.७८ कोटी थेट लाभ हस्तांतरणाद्वारे देण्यात आले. जिल्हानिहाय निधी वितरणही जाहीर झाले असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे.

राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेअंतर्गत ८वा हप्ता आज अधिकृतपणे वितरित करण्यात आला असून तब्बल ८९,७५,२९८ शेतकरी कुटुंबांच्या खात्यावर ₹१७९८.७८ कोटी रुपये थेट जमा करण्यात आले आहेत.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा हप्ता लवकरच! १५०० की थेट ३०००? मोठा अपडेट समोर

मुंबईतील विधान भवन येथे आयोजित विशेष कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा निधी वितरित करण्यात आला. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा अजित पवार तसेच अनेक वरिष्ठ मंत्री आणि अधिकारी उपस्थित होते.

ही योजना केंद्राच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर सुरू करण्यात आली असून, शेतकऱ्यांना दरवर्षी ₹१२,००० इतकी आर्थिक मदत मिळते. यामध्ये केंद्र सरकारकडून ₹६,००० आणि राज्य सरकारकडून ₹६,००० अशी थेट मदत दिली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजांना मोठा आधार मिळत आहे.

जिल्हानिहाय निधी वितरण – कुठे किती रक्कम?

८व्या हप्त्यात जिल्हानिहाय निधीचे वितरण करण्यात आले असून काही प्रमुख जिल्ह्यांतील आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे:

  • अहिल्यानगर – ₹१०८.३० कोटी
  • पुणे – ₹८५.२४ कोटी
  • नाशिक – ₹८३.८६ कोटी
  • सोलापूर – ₹९७.५२ कोटी
  • कोल्हापूर – ₹९२.३३ कोटी
  • सातारा – ₹८७.०७ कोटी
  • जळगाव – ₹७७.४० कोटी
  • नांदेड – ₹७६.५० कोटी
  • सांगली – ₹७५.४९ कोटी
  • बीड – ₹७२.७० कोटी

याशिवाय इतर सर्व जिल्ह्यांनाही त्यांच्या शेतकरी संख्येनुसार निधी वितरित करण्यात आला आहे.

मिनी ट्रॅक्टरसाठी सरकार देतंय 90% अनुदान , असा करा अर्ज , पहा सविस्तर माहिती

शेतकऱ्यांची भावना – “मोठा दिलासा, पण अपेक्षा अजूनही कायम”

या निधीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत असले तरी काही शेतकरी अजूनही वाढत्या खर्चामुळे अधिक मदतीची अपेक्षा व्यक्त करत आहेत. शेतीसाठी वाढणारे खत, बियाणे आणि इंधनाचे दर पाहता ही मदत अत्यंत महत्त्वाची ठरत आहे.

महत्त्वाची सूचना

  • सर्व शेतकऱ्यांनी तात्काळ आपले बँक खाते तपासावे
  • DBT द्वारे पैसे जमा झाले आहेत
  • KYC पूर्ण असणे आवश्यक आहे

योजनेचा एकूण आढावा

२४ मार्च २०२६ अखेर या योजनेअंतर्गत १ ते ७ हप्त्यांमध्ये ₹१३,०१७.३० कोटी रक्कम ९३.०८ लाख शेतकरी कुटुंबांना वितरित करण्यात आली आहे. आता ८व्या हप्त्यामुळे ही रक्कम आणखी वाढली आहे.

Leave a Comment