PM Vishwakarma Yojana : पीएम विश्वकर्मा योजनेतून गवंडी, सुतार, टेलर, सोनार यांसारख्या पारंपरिक व्यवसाय करणाऱ्यांना प्रशिक्षणानंतर ₹१५,००० चा मोफत कीट, ₹५०,००० पर्यंतचे कर्ज आणि सरकारकडून आर्थिक सहाय्य मिळणार आहे. आतापर्यंत सुमारे २५ हजार अर्ज प्राप्त झाले असून जिल्हा उद्योग केंद्रांमार्फत प्रक्रिया सुरू आहे.
पारंपरिक व्यवसाय करणाऱ्यांसाठी केंद्र सरकारने सुरू केलेली पीएम विश्वकर्मा योजना आता प्रत्यक्षात प्रभावीपणे राबवली जात आहे. गवंडी, सुतार, टेलर, सोनार, लोहार, मूर्तिकार, बांगडीकार, धोबी अशा १८ प्रकारच्या पारंपरिक व्यवसायिकांना या योजनेतून प्रशिक्षण, कीट व आर्थिक सहाय्य दिले जात आहे.
या शेतकऱ्यांना रेन गन खरेदीसाठी मिळणार ₹४२,५०० अनुदान , असा करा ऑनलाईन अर्ज
काय आहे योजना?
१७ सप्टेंबर २०२३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेचा शुभारंभ केला होता. या योजनेचा उद्देश पारंपरिक कौशल्य असलेल्या व्यक्तींचे प्रशिक्षण, त्यांना आधुनिक उपकरणे व आर्थिक मदत देणे आहे.
काय मिळणार लाभार्थ्यांना?
| लाभ | तपशील |
|---|---|
| प्रशिक्षण | दररोज ₹५०० भत्ता |
| कीट | प्रशिक्षणानंतर ₹१५,००० चा मोफत कीट |
| कर्ज | पहिल्या टप्प्यात ₹१ लाख, दुसऱ्या टप्प्यात ₹२ लाख (व्याजदर ५%) |
| डिजिटल प्रमाणपत्र | ओळख व मान्यता मिळवण्यासाठी आवश्यक |
| मार्केटिंग व ब्रँडिंग | प्रशिक्षणात बाजारपेठ कशी मिळवावी याचे मार्गदर्शन |
पात्रता व अर्ज प्रक्रिया
- वय: १८ वर्षांवरील पुरुष व महिला
- व्यवसाय: परंपरागत कौशल्य असलेले किमान १ वर्ष अनुभव असलेले व्यावसायिक
- आवश्यक कागदपत्रे: आधार कार्ड, बँक पासबुक, फोटो, मोबाइल क्रमांक
- जिल्हा उद्योग केंद्रांमार्फत अर्ज स्वीकृतीची प्रक्रिया सुरू आहे.
घरकुल योजना : आपल्या गावची घरकुल यादी पहा मोबाईलवर , येथे चेक करा
आतापर्यंतचे यश
- २५,००० अर्ज प्राप्त झाले असून त्यांची छाननी सुरू आहे.
- यापैकी पात्र लाभार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाईल आणि कीट वितरित केला जाईल.
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
प्रशिक्षण व स्टार्टअपला चालना
गावपातळीवर स्वतःचा व्यवसाय उभारणाऱ्या व्यक्तींना या योजनेमुळे नवसंजीवनी मिळणार आहे. टेलर, लोहार, गवंडी आदींना आवश्यक ते टूल्स कीट प्रशिक्षणानंतर दिले जाणार असून, ते स्वतःचे काम सुरू करू शकतील.
