CLOSE AD

मागेल त्याला शेततळे योजना : ऑनलाईन अर्ज सुरु , जाणून घ्या सविस्तर माहिती

Magel Tyala Shet Tale Yojana : मंडळी मागेल त्याला शेततळे योजना 2025 ही महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेचा उद्देश राज्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी पाण्याचा साठा उपलब्ध करून देणे आणि जलसंधारणाला प्रोत्साहन देणे हा आहे. शेततळ्यांमुळे पावसाचे पाणी साठवता येते आणि शेतीला वर्षभर पाण्याचा पुरवठा करता येतो.

योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो?

या योजनेचा लाभ राज्यातील कोणताही शेतकरी घेऊ शकतो. कोणतीही जाती, धर्म किंवा जमीनधारणा यावर बंधन नाही, फक्त पात्रतेच्या अटी पूर्ण करणे आवश्यक आहे.

Crop Insurance : घरबसल्या मोबाईलवरून असा भर पीक विमा , जाणून घ्या सविस्तर

अर्ज कसा करायचा?

अर्ज करण्यासाठी आपले सरकार या पोर्टलवर जावे लागेल. https://aaplesarkar.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर प्रथम नोंदणी करावी लागते. नंतर मागेल त्याला शेततळे योजना हा पर्याय निवडून अर्ज भरायचा आहे. त्यामध्ये शेताची व शेतकऱ्याची माहिती द्यावी लागते. माहिती भरल्यानंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्ज सादर करायचा आहे.

अर्ज करताना लागणारी कागदपत्रे

  • 7/12 उतारा
  • आधार कार्ड
  • बँक पासबुक (IFSC कोडसह)
  • जमीन नकाशा
  • पासपोर्ट साईज फोटो

👧 लेक लाडकी योजना : या योजनेअंतर्गत मुलगी असेल तर मिळेल 1 लाख 1 रुपये , असा करा अर्ज

योजना निवड कशी केली जाते?

शासनाकडून आलेले अर्ज तपासले जातात आणि पात्र शेतकऱ्यांची निवड केली जाते. योजना मागणीप्रमाणे असल्यामुळे जो लवकर अर्ज करतो, त्याला प्राधान्य दिले जाते.

अधिक माहिती कुठे मिळेल?

योजनेबाबत अधिक माहिती हवी असल्यास तुम्ही तुमच्या तालुक्यातील कृषी अधिकारी कार्यालयात संपर्क करू शकता. याशिवाय https://mahagovyojana.com या संकेतस्थळावर सुद्धा उपयुक्त माहिती मिळू शकते.

Leave a Comment