Crop Insurance : शेतकरी बांधवांनो आता पिक विमा योजना 2025 साठी अर्ज करणे अधिक सोपे झाले आहे. घरबसल्या, मोबाईलवरून अवघ्या काही मिनिटांत तुम्ही अर्ज करू शकता. कोणत्याही एजंटची गरज नाही, कार्यालयांचे फेरे नाहीत आणि वेळेचा अपव्यय नाही. सरकारने यासाठी अधिकृत Crop Insurance App तयार केले आहे.
पिक विमा योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया
प्रधानमंत्री फसल बीमा योजना (PMFBY) अंतर्गत खरीप हंगाम 2025 साठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी मोबाईलवरील अधिकृत अॅपचा वापर करून तुम्ही सहज अर्ज करू शकता आणि संपूर्ण प्रक्रिया सुरक्षित आणि पारदर्शक आहे.
राज्यातील 18 हजार शाळा बंद होणार ? जाणून घ्या सविस्तर माहिती
Crop Insurance App कसे वापराल?
Crop Insurance App हे कृषी विभागाने विकसित केलेले अधिकृत अॅप आहे आणि ते Google Play Store वर मोफत उपलब्ध आहे. या अॅपच्या मदतीने नोंदणी, योजना निवड, पीक व वैयक्तिक माहिती भरना, कागदपत्रे अपलोड करणे, प्रीमियम भरणे आणि पावती डाऊनलोड करणे अशा सर्व सुविधा मिळतात.
ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत
1) सर्वप्रथम Google Play Store वरून Crop Insurance App डाउनलोड करा.
2) मोबाईल क्रमांक टाकून नोंदणी करा आणि OTP ने खाते व्हेरिफाय करा.
3) राज्य, हंगाम, योजना आणि वर्ष निवडा (उदा. महाराष्ट्र, खरीप, PMFBY, 2025).
4) तुमची बँक माहिती, आधार क्रमांक, शेतकरी प्रकार, पत्ता आणि पिकाची सविस्तर माहिती भरा.
5) सातबारा, आठ-अ उतारे, बँक पासबुक, पेरणी प्रमाणपत्र, फोटो इत्यादी आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
6) प्रीमियम भरताना UPI, नेट बँकिंग किंवा डेबिट कार्ड वापरू शकता.
7) पेमेंटनंतर पावती आणि पॉलिसी तपशील अॅपमधून पाहता येईल.
सरकार देत आहे 50,000 रुपयापर्यंत कर्ज , असा करा ऑनलाईन अर्ज
आवश्यक कागदपत्रांची यादी
आधार कार्ड, बँक पासबुक किंवा रद्द चेक, सातबारा आणि आठ-अ उतारा, पीक पेरणी प्रमाणपत्र किंवा स्वयंघोषणापत्र, फोटो आणि पत्ता पुरावा लागतो.
ऑनलाईन अर्जाचे फायदे
पिक विमा अर्जाची संपूर्ण प्रक्रिया घरबसल्या पूर्ण करता येते. एजंटचा खर्च वाचतो आणि प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल असल्यामुळे पारदर्शकता राखली जाते. नुकसान भरपाई थेट शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा होते. वेळ आणि कागदी कामकाज कमी होते आणि सरकारी कार्यालयांवरचा ताण सुद्धा कमी होतो.
🌾 डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना मिळणार ७५% पर्यंत अनुदान
खरीप हंगाम 2025 साठी पिक घेत असाल, तर आजच ऑनलाईन पिक विमा अर्ज करा. मोबाईल अॅपचा वापर करून काही मिनिटांत अर्ज करा आणि आपल्या पिकाचे सुरक्षिततेचे कवच मिळवा.