मुरुड जंजिरा किल्ल्या विषयी माहिती Murud Janjira Fort

Murud Janjira Fort – महाराष्ट्राला समुद्र किनाऱ्याची खूप मोठी किनारपट्टी लाभलेली आहे. त्यामुळे या किनारपट्टीवर अनेक ठिकाणी पूर्वीच्या काळी जलदुर्ग बांधले गेलेले आहेत. अशा अनेक जलदुर्गांपैकी एक आहे जंजिरा. जंजिरा हा दुर्ग रायगड जिल्ह्यातील मुरुड या गावात आहे. अतिशय सुंदर किनारपट्टीवर वसलेला हा मुरुड जंजिरा किल्ला अभेद्य मानला जातो तसेच या किल्ल्याच्या चारही बाजूंनी अरबी समुद्राने वेढलेल्या आहेत.

Murud Janjira Fort मुरुड जंजिरा किल्ल्या विषयी माहिती

रायगड जिल्ह्याच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे. या समुद्राला लागूनच मुरुड तालुक्यातील मुरुड Murud Janjira Fort नावाचे छोटेसे गाव आहे. मुरूडच्या पुढे दंडा आणि राजा राजपुरी ही गावे समुद्रकिनारी आहेत. मुरुडपासून राजपुरी पाच किलोमीटर अंतरावर आहे. हे गाव खाडीच्या किनाऱ्यावर आहे. या राजपुरी गावाच्या पश्चिमेला समुद्रात एका बेटावर मुरुड-जंजिरा आहे. राजपुरीहून या किल्ल्यावर जाण्यासाठी शिडाच्या होड्यांची सोय आहे. समुद्राचे बांधकाम आणि आजूबाजूला समुद्र याशिवाय मुरुड-जंजिराच्या तटावर 572 तोफ आहे. त्यामुळे हा जंजिरा अभेद्य होता. या तोफां मध्ये विशेष मोठी आणि लांब पल्ल्याची कलाल बांगडी ही तोफ होती. शिवाजी महाराजांच्या काळात महाराष्ट्राच्या स्वराज्यासाठी हा जंजिरा शेवटपर्यंत अजेय राहिलेला आहे .

याचा इतिहास खूप जुना आहे. हे जंजिरा Murud Janjira Fort या शब्दाचा अर्थ समुद्राने वेढलेला असा होतो. या किल्ल्याचे बांधकाम इ.वी.सन 1567 ते 1571 या काळात बुर्‍हाणखानने केले होते. या तटावर उत्तम प्रतीच्या तोफा असल्यामुळे हा किल्ला सदैव अजिंक्य राहिलेला आहे. जंजिरा हा शब्द अरबी भाषेतील जझीरा या शब्दा वरुन आलेला आहे. याचा अर्थ असा होतो, पूर्वी राजपुरीला कोळी लोकांची वस्ती होती. त्यांना लुटारु आणि चाचे लोकांचा फार त्रास होई. त्यांना प्रतिबंध करण्यासाठी लाकडाचे ओंडके जमिनीत रोहून तटबंदी तयार करण्यात आली होती. परंतु पिरमखान या निजामी सरदाराने दारूच्या व्यापाराचे सोंग करून तटबंदीच्या आत शिरला आणि आपल्या सैन्याच्या मदतीने सर्वांची कत्तल करुन मेढेकोट ताब्यात घेतला.

काही इतिहास तज्ञांच्या मते, या बेटावर मूळ कोळी लोकांचे वास्तव्य असल्याने जंजिरा हा किल्ला पूर्वीपासून कोळी राजाच्या सत्तेखाली होता, कदाचित येथील कोळी शासक हेच प्रथम जंजिऱ्याचे जनक असावेत. यादवांचे शासन संपून सुलतानी राज्य आल्यानंतर सुद्धा इ.स 1490 पर्यंत हा किल्ला स्वतंत्रच होता. नंतर  1485 मध्ये मलिक अहमद ने जंजिरा जिंकण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा कोळ्यांचा नेता होता. रामभाऊ कोळी यांच्या पराक्रमापुढे अहमद मलिकने हात टेकले होते.

See also  Bank of Maharashtra Bharti 2023 | बँक ऑफ महाराष्ट्र भरती 2023.

नक्की वाचा – माझे स्वप्न मराठी निबंध

राम पाटील हा खूप पराक्रमी व शूर होता. राम  पाटलांकडून हा किल्ला सहज मिळविणे शक्य नाही. हे  निजामाच्या चांगले लक्षात आले होते. यासाठी काहीतरी युक्ती लढविणे गरजेचे होते. म्हणून हा किल्ला ताब्यात घेण्यासाठी निजामाने पिरमलखानची नेमणूक केली. पिरमलखानने अतिशय धूर्तपणे आणि विश्वास घाताने किल्ल्यात प्रवेश मिळून किल्ला ताब्यात मिळविला. पिरम खाणाच्या जागी नंतर बुर्‍हाणखानाची नेमणूक झाली. ज्याने जंजिरा हा किल्ला उभारला. त्यानंतर इ.स.सन 1617 मध्ये सिद्धी अंबर याने बादशहाकडून जंजिरा किल्ल्याची जहागिरी प्राप्त केली. यालाच जंजिरा स्थानाचा संस्थानाचा मूळ पुरुष मानतात. जंजिऱ्याचे Murud Janjira Fort सिद्दी याचे मूळ अबिसिनियामध्ये असून ते अतिशय शूर व दणकट होते.

त्यांनी अखेरपर्यंत जंजिरा कोणाच्या हाती जाऊ दिला नाही. अनेक राजांनी जंजिरा जिंकण्याचे अविरत प्रयत्न केले. परंतु कोणालाही त्यात यश मिळाले नाही. सन 1617 ते 30 जून 1947 वर्षे 330 वर्ष जंजिरा अजिंक्य राहिलेला आहे. जंजिऱ्याचे प्रवेशद्वार पूर्वाभिमुख आहे. होडीने किल्ल्याच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचल्या वर या प्रवेशद्वाराच्या आत एक उपदार आहे. प्रवेशद्वाराजवळ एक शिल्प आहे. गुरुनानकांची दर्पोक्तीच या चित्रातून दिसून येते. एका वाघाने चारही पायात हत्ती पकडले आहेत व शेपटीत एक हत्ती गुंडाळला आहे असे ते चित्र आहे. बुरान खान इतर सत्ताधीशांना सुचवतो आहे की, तुम्ही हत्ती असाल पण विषय आहे. या किल्ल्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याचे धाडस करु नका. असे त्या चित्राचे निरीक्षण केल्यास स्पष्ट होते.

जंजिर्‍याची Murud Janjira Fort तटबंदी बुलंद आहे. त्याला सागराकडे ही एक दरवाजा आहे असे 19 बुलंद बुरुज आहेत दोन बुरुजांमध्ये नंतर 90 फुटापेक्षा जास्त आहे. तटबंदीवर जाण्यासाठी जागोजागी पायऱ्या ठेवलेल्या आहेत. तटबंदीमध्ये कमानी आहेत. त्या कमानीमध्ये तोंड करून तोफा ठेवलेल्या आहेत. जंजीर्यावर 514 तोफा असल्याचा उल्लेख आहे. यातील कलालबांगडी लांडा कासम व चावरी या तोफा आजही आपल्याला येथे पाहायला मिळतात. किल्ल्याच्या मध्यभागी सुरुलखानाचा भव्य वाडा आज पडक्या अवस्थेत आहे. पाण्याचे दोन मोठे तलाव आहेत. किल्ल्यामध्ये पूर्वी तीन मोहल्ले होते. यातील दोन मोहल्ले मुसलमानांचे व एक इतरांचा असे होते.

See also  The Minister Will Take The Clay Game to the International Level | मातीतील खेळाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणार मंत्री

पूर्वी किल्ल्यामध्ये मोठी वस्ती होती. राजाश्रय संपल्यानंतर ती सर्व वस्ती तिथून उठून गेली. जंजिर्याच्या तटबंदीवरुन विस्तृत प्रदेश दिसतो. यात समुद्रात बांधलेला कासा उर्फ पद्मदुर्ग या किनाऱ्यावरील सामराजगड हे ही येथून दिसतात. 330 वर्षे अभेद्य आणि अजिंक्य राहिलेला जंजिरे नेहरू पाहतांना इतिहासातील अनेक पर्वाचा आलेख आपल्या नजरेसमोरुन तरळुन जातो.

या किल्ल्यातील सिद्दी सरदारांनी हा किल्ला सदैव अजिंक्य राखला. संभाजी महाराजांनी तर हा किल्ला हस्तगत करण्यासाठी या किल्ल्याजवळ पाच सहा किलोमीटर अंतरावर पद्मदुर्ग नावाचा मजबूत किल्ला उभारला होता. पण तरीही मुरुडचा जंजिरा जिंकणं महाराजांना शक्य होऊ शकले नाही.

या किल्ल्यावर पाहण्यासारखे विविध स्थळ आहेत. त्यांच्याविषयी माहिती पाहू. या किल्ल्याच्या मध्यभागी पाच मजली भव्य वाडा आहे. आज मात्र थोडा पडक्या अवस्थेत आहे. परंतु तरीही इतरांसाठी एक पर्यटन स्थळ म्हणून हा वाडा आहे. किल्लामध्ये लोकांना पाणी पिण्याची सुविधा उपलब्ध आहे. तेथे गोड्या पाण्याचे दोन मोठे तलाव बांधले गेले होते. त्यांना आजही पाणी आहे. तसेच या किल्ल्यामध्ये लोकांसाठी चे तीन मोहल्ले वसविले होते असे म्हटले जाते. त्यातील दोन मुसलमानांचे व एक इतरांचा साठी होते. अशी त्यांची वस्ती होती हे सुद्धा पाहण्या सारखी गोष्ट आहे.

पारशी लेख, प्रवेश द्वाराजवळील पांढ-या दगडातील पारशी लेख आहे. हा पाहण्यासारखा आहे.

दगडात कोरलेले शिल्प :
दगडात कोरलेली शिल्प व दरवाज्याच्या दोन्ही भिंतीच्या व विशिष्ट प्रकारात कोरलेले आहे. हे शिल्प गजान्त लक्ष्मीचे शिल्प म्हणून ओळखले जाते.

नगरखाना :                                                                                                                                                                जंजिरा किल्ल्याच्या महाद्वाराजवळ नगरखाना आहे.

See also  दौलताबाद किल्ला विषयी माहिती 2021 - Daulatabad Killa Information In Marathi

कलाल बांगडी तोफ :
किल्ल्याच्या वर तटावर तोफा ठेवलेल्या आहेत त्यातील सर्वात मोठी तोफ ती म्हणजे कलाल बांगडी कशी आहे ती तोफ त्याकाळी खूप प्रसिद्ध होती किल्ल्यामध्ये पाच पीर आहेत.

सुरूलखानाचा वाडा:                                                                                                                                                   किल्ल्या बाहेर पडल्यानंतर समोर तीन मजली इमारत नजरेस पडते ही इमारत सुरूलखानाचा वाडा म्हणून ओळखला जातो. हे गोड्या पाण्याचे तलाव सुरूलखानाचा वाडा समोर सुंदर बांधकाम केलेली एक षटकोनी आकाराची गोड्या पाण्याची विहीर आहे. पश्चिम दरवाजा गडाच्या पश्चिम दिशेला बाहेर पडण्यासाठी एक दरवाजा आहे. या दरवाजाला दर्या दरवाजा असे म्हणतात. या दरवाजाचे तोंड हे दर्याच्या म्हणजेच सागराच्या दिशेने असल्याने संकटकाळी बाहेर पडण्यासाठी हा दरवाजा वापर करण्यात येत होता.

संपूर्ण किल्ला पाहण्यासाठी कमीत कमी तुम्हाला लागणारा वेळ हा तीन तास आहे. येथे कसे पोहोचाल या विषयी अलिबाग मार्गे गेल्यास तुम्हाला जंजिरा दुर्गाला भेट द्यायची असेल तर मुंबई मार्गे अलिबाग आणि अलिबागहून रवंथवाडा मार्गे मुरुडला जाता येते. मुरुड गावातून राजपुरीकडे बस व खाजगी वाहने असतात. तसेच त्याचा दुसरा मार्ग म्हणजे पाली, रोहा, नागोनठाणे, साळाव, नांदगाव मार्गे मुरुडला जाता येते. मुरुड होऊन जंजिरा या मार्गाची निवड करता येते.

“तुम्हाला आमची माहिती Murud Janjira Fort कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.”

Leave a Comment