LPG-PNG New Rule: घरात PNG असेल तर LPG सिलिंडर मिळणार नाही? सरकारचे नवे नियम जाहीर; e-KYC अनिवार्य

LPG-PNG New Rule: एलपीजी आणि पीएनजी गॅस ग्राहकांसाठी केंद्र सरकारने नवे नियम लागू केले आहेत. घरात आधीच PNG पाईप गॅस कनेक्शन असल्यास LPG सिलिंडर ठेवता येणार नाही. तसेच गॅस ग्राहकांसाठी e-KYC अनिवार्य करण्यात आले आहे. नियम न पाळल्यास गॅस बुकिंग थांबवले जाऊ शकते.

घरगुती गॅस वापरणाऱ्या ग्राहकांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. केंद्र सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने एलपीजी (LPG) आणि पाईपद्वारे नैसर्गिक वायू (PNG) कनेक्शनबाबत नवीन नियमावली जाहीर केली आहे. या नव्या नियमांचा परिणाम विशेषतः अशा कुटुंबांवर होणार आहे ज्यांच्याकडे PNG पाईप गॅस आणि LPG सिलिंडर दोन्ही सुविधा उपलब्ध आहेत.

Petrol Diesel Price Update: पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या चर्चांवर सरकारचे स्पष्टीकरण; देशात इंधनाचा पुरेसा साठा, नागरिकांनी घाबरू नये

सरकारने स्पष्ट केले आहे की एका घरात PNG आणि LPG अशी दोन्ही गॅस कनेक्शन ठेवण्यास परवानगी दिली जाणार नाही. जर एखाद्या घरात आधीच PNG कनेक्शन सक्रिय असेल, तर त्या कुटुंबाला घरगुती LPG सिलिंडर ठेवता येणार नाही.

या निर्णयामागे गॅसचा काळाबाजार रोखणे आणि सबसिडीचा योग्य वापर सुनिश्चित करणे हा सरकारचा उद्देश असल्याचे सांगितले जात आहे.

डबल गॅस कनेक्शनवर सरकारची कारवाई

सरकारच्या नव्या नियमांनुसार अनेक शहरांमध्ये असे आढळून आले आहे की काही कुटुंबांकडे PNG पाईप गॅस असूनही LPG सिलिंडरचे कनेक्शन सक्रिय आहे.

यामुळे सबसिडीचा चुकीचा वापर होण्याची शक्यता निर्माण होते. त्यामुळे सरकारने अशा डबल कनेक्शनवर नियंत्रण ठेवण्यासाठी कडक नियम लागू केले आहेत.

नवीन नियमांनुसार:

१) एका घरात PNG आणि LPG दोन्ही कनेक्शन ठेवता येणार नाहीत
२) PNG कनेक्शन असलेल्या ग्राहकांना LPG सिलिंडर बुक करता येणार नाही
३) दोन्ही सुविधा असणाऱ्या ग्राहकांनी LPG कनेक्शन परत करणे आवश्यक आहे
४) PNG ग्राहकांना नवीन LPG कनेक्शन मिळणार नाही

रेशन कार्डवर सरकारची कडक कारवाई! घरात AC-कार असल्यास लाभ बंद? ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

e-KYC प्रक्रिया अनिवार्य

सरकारने गॅस ग्राहकांसाठी e-KYC प्रक्रिया अनिवार्य केली आहे. ग्राहकांनी आपली ओळख आधार कार्डद्वारे पडताळणे आवश्यक आहे.

जर ग्राहकांनी e-KYC पूर्ण केली नाही, तर त्यांना खालील अडचणी येऊ शकतात:

१) नवीन गॅस कनेक्शन मिळणार नाही
२) सिलिंडर बुकिंग प्रक्रिया थांबवली जाऊ शकते
३) सबसिडी मिळण्यात अडथळे येऊ शकतात

या प्रक्रियेचा उद्देश म्हणजे खऱ्या लाभार्थ्यांची ओळख निश्चित करणे आणि चुकीच्या नावावर असलेली कनेक्शन बंद करणे.

गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी निर्णय

पेट्रोलियम मंत्रालयाच्या माहितीनुसार काही ठिकाणी एका व्यक्तीच्या नावावर अनेक गॅस कनेक्शन असल्याची प्रकरणे समोर आली होती. त्यामुळे गॅसचा काळाबाजार आणि सबसिडीचा गैरवापर होण्याची शक्यता वाढली होती.

नवीन नियमांमुळे अशा प्रकारच्या गैरप्रकारांवर नियंत्रण ठेवणे शक्य होईल.

ग्राहकांनी काय करावे?

ज्या कुटुंबांकडे PNG आणि LPG दोन्ही सुविधा आहेत त्यांनी आपल्या गॅस एजन्सीशी संपर्क साधून आवश्यक प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे. तसेच सर्व ग्राहकांनी आपली e-KYC प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे आवश्यक आहे.

पारदर्शक गॅस वितरण प्रणालीचा उद्देश

सरकारच्या मते या निर्णयामुळे घरगुती गॅस वितरण व्यवस्था अधिक पारदर्शक होईल आणि सबसिडीचा लाभ फक्त पात्र ग्राहकांपर्यंतच पोहोचेल.

Leave a Comment