Weather Update : मंडळी हवामान विभागाचे अधिकारी कृष्णानंद होसाळीकर यांच्या माहितीनुसार पुढील पाच दिवस महाराष्ट्रात तीव्र हवामान स्थिती राहणार आहे. भारतीय हवामान विभाग (IMD) ने राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्रातील घाट परिसर आणि विदर्भातील काही भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मराठवाड्यात मात्र काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे.
🚲 सरकारची मोठी घोषणा : या मुलींना मिळणार मोफत सायकल – अर्ज प्रक्रिया सुरू, पूर्ण माहिती जाणून घ्या!
गेल्या 48 तासांत कोकण आणि घाटमाथ्याच्या परिसरात जोरदार पाऊस झाला असून, मुंबई शहर आणि उपनगरांमध्येही पावसाच्या सरींचा जोर कायम आहे. पुढील 48 तासांतही हेच वातावरण राहणार असून, शनिवारपासून पावसाचा जोर वाढेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. याच काळात काही भागांत अतिवृष्टीची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. घाटमाथ्यावर पावसाळी ढगांची दाटी होईल आणि दृश्यमानता कमी होण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
सध्या पश्चिम बंगालच्या उत्तरेकडील भागांवर आणि आसपासच्या प्रदेशात चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. तसेच उत्तर गुजरातपासून पश्चिम बंगालपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. महाराष्ट्र-कर्नाटक किनारपट्टीजवळ समुद्रसपाटीवर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून, हे हवामान पश्चिमेकडे सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात पावसाचा जोर वाढेल, असे IMD ने सांगितले आहे.
👩🦰 या महिलांना मिळणार 5 लाख रुपयांपर्यंत अनुदान – जाणून घ्या कोण पात्र आहे आणि अर्ज कसा करावा!
कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट भागात पावसाचा जोर सर्वाधिक राहणार आहे. त्यामुळे पावसाळी सहलीसाठी जाणाऱ्या पर्यटकांना विशेष सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे, कारण नद्या आणि नाले जोरदार वाहत आहेत.
फक्त कोकणच नव्हे, तर पूर्व विदर्भातील भंडारा, नागपूर, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये रविवार आणि सोमवारी मुसळधार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातही मुसळधार पाऊस पडू शकतो, तर उर्वरित भागांत हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज आहे.
