CLOSE AD

या महिलांना मिळणार मोफत शिलाई मशीन , येथे करा त्वरित अर्ज

Shilai Machine Yojana Last Date : नमस्कार मित्रांनो ग्रामीण भागातील महिलांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत शिलाई मशीन अनुदान योजना राबवली जात आहे. या योजनेचा उद्देश म्हणजे महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत करणे आणि त्यांना आत्मनिर्भर बनवणे.

अनेक महिला स्वतःच्या पायावर उभे राहू इच्छितात. मात्र सुरुवातीसाठी लागणाऱ्या भांडवलाचा अभाव हे एक मोठं अडथळा ठरतं. या योजनेच्या माध्यमातून शासन अशा महिलांना 90 टक्के अनुदानावर शिलाई मशीन देत आहे. म्हणजेच मशीनचा केवळ 10 टक्के खर्च महिलेला स्वतः करावा लागतो.

शेतकरी, शेतमजूर व बचतगटांसाठी सुधारित कृषी अवजार पुरवठा योजना – ५०% अनुदानावर ऑनलाईन अर्ज सुरु

अर्ज करण्यासाठी तारीख आणि ठिकाण

ही योजना संपूर्ण महाराष्ट्रभर राबवली जात असली तरी प्रत्येक जिल्ह्यात अर्ज करण्याच्या तारखा वेगवेगळ्या असतात. जालना जिल्ह्यासाठी 1 जुलै 2025 ते 30 जुलै 2025 या कालावधीत अर्ज स्वीकारले जात आहेत.

अर्ज करण्याची पद्धत

शिलाई मशीनसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक महिलांनी आपल्या जिल्हा परिषदेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे. तिथे महिला व बालकल्याण विभागाच्या योजनेखाली शिलाई मशीन विषयी सविस्तर माहिती मिळेल. अर्ज दोन प्रकारे करता येतो – ऑनलाईन आणि ऑफलाइन.

या योजनांचे अर्ज सुरु , जाणून घ्या सर्व योजनांची सविस्तर माहिती

ऑनलाईन अर्जासाठी पीडीएफ फॉर्म डाउनलोड करून त्यामध्ये आवश्यक माहिती भरावी लागते. फॉर्ममध्ये अर्जदाराचे नाव, पत्ता, वय, शैक्षणिक पात्रता, कुटुंबाची आर्थिक स्थिती, शिलाई प्रशिक्षणाची माहिती, बँक तपशील, आधार क्रमांक वगैरे माहिती भरावी लागते. रंगीत फोटो लावून त्यावर स्वाक्षरी करणे आवश्यक आहे.

अर्ज करताना लागणारी कागदपत्रे

1) रहिवासी प्रमाणपत्र
उत्पन्नाचा दाखला
2) दारिद्र्यरेषेखालील कुटुंब असल्यास त्याचे प्रमाणपत्र
3) ग्रामपंचायतीकडून योजनेचा लाभ यापूर्वी घेतला नसल्याचे प्रमाणपत्र
4) आधार कार्ड, बँक पासबुक
5) जातीचा दाखला (SC प्रवर्गासाठी)
6) शिलाई प्रशिक्षण प्रमाणपत्र (शासन मान्यताप्राप्त संस्थेकडून)
7) शाळा सोडल्याचा दाखला किंवा मतदान ओळखपत्र (वय सिद्ध करण्यासाठी)
8) शौचालय असल्याचा ग्रामसेवकाकडून मिळवलेला दाखला
9 शिलाई मशीन इतरांना हस्तांतरित न करण्याबाबतचे हमीपत्र
10) अनुदानाचा 10 टक्के हिस्सा भरला जाईल याचे वैयक्तिक हमीपत्र

पावसाचा अंदाज : पुढील 2 दिवस या जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता

योजनेच्या काही अटी व नियम

या योजनेच्या लाभासाठी काही अटी पाळणं गरजेचं आहे. लाभार्थिनीच्या घरी शौचालय असणं बंधनकारक आहे. कुटुंबातील कोणताही सदस्य ग्रामपंचायत, जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीचा सदस्य नसावा. तसेच कुटुंबात कोणीही शासकीय किंवा निमशासकीय सेवेत कार्यरत नसावा. या गोष्टींची खात्री ग्रामसेवकाच्या दाखल्यावरून केली जाते.

शिवाय अर्जदार महिलेनं शासनाकडून मिळालेली शिलाई मशीन इतर कोणालाही हस्तांतरित करू नये, यासाठी लेखी हमीपत्र द्यावं लागतं. सर्व कागदपत्रांची पूर्तता करून फॉर्म तालुका स्तरावरील महिला व बालकल्याण विभागाच्या कार्यालयात सादर करावा लागतो.

शिलाई मशीन अनुदान योजना ही केवळ आर्थिक मदत नाही, तर महिलांच्या हातात कात्री व सूई देत त्यांना स्वतःचं भविष्य शिवण्याची संधी आहे. जर तुम्ही किंवा तुमच्याच ओळखीत कोणी महिला ही संधी मिळवू इच्छित असेल, तर निश्चितच हा अर्ज वेळेत भरावा.

अधिक माहिती साठी https://zpjalna.maharashtra.gov.in/scheme/ग्रामीण-भागातील-महिलांना/ या शासनाच्या अधिकृत संकेस्थळाला भेट द्या.

Leave a Comment