Rain Compensation : अतिवृष्टी आणि पुरामुळे उध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र सरकारकडून ₹३१,६२८ कोटींचं आर्थिक पॅकेज जाहीर करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. या पॅकेजअंतर्गत शेती, घर, जनावरं आणि पिकांचं नुकसान भरून काढण्यासाठी थेट आर्थिक मदत दिली जाणार आहे.
पुरामुळे शेतकऱ्यांचे हाल
गेल्या काही आठवड्यांपासून राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे जगणे उद्ध्वस्त झाले आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील हजारो शेतकऱ्यांचे पिकं वाहून गेली, जमिनी खरडून गेल्या आणि जनावरं बुडून मृत्युमुखी पडली. शेतकऱ्यांनी प्रचंड नुकसान सोसले असून अनेकांचे संसार अक्षरशः उघड्यावर पडले आहेत.
फक्त या लोकांनाच मिळणार मोफत राशन – नवीन यादी जाहीर, तुमचं नाव आहे का?
शेतकऱ्यांचे नुकसान किती मोठं?
राज्यात एकूण १ कोटी ४३ लाख ५२ हजार हेक्टर क्षेत्रात पिकांची लागवड झाली होती. त्यापैकी तब्बल ६८ लाख ६९ हजार ७५६ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे पूर्ण नुकसान झाले आहे. शेतात पाणी आणि चिखल साचल्याने रब्बी पेरणीची तयारीही ठप्प झाली आहे. शेतकऱ्यांची उत्पादन क्षमता कोसळल्याने अनेक कुटुंबं उपजीविकेच्या संकटात सापडली आहेत.
सरकारकडून मोठं आर्थिक पॅकेज
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्य सरकारने ₹३१,६२८ कोटींच्या मदत पॅकेजची घोषणा केली.
- तत्काळ मदतीसाठी प्रत्येक शेतकऱ्याला ₹१०,००० देण्यात येणार.
- गहू व तांदूळाचे मोफत वितरण सुरु होणार.
- प्रधानमंत्री आवास योजनेतून घर बांधणीसाठी मदत.
- डोंगरी भागातील घरांना अतिरिक्त ₹१०,००० मिळणार.
या पॅकेजअंतर्गत शेतकऱ्यांच्या सर्व घटकांचा विचार करण्यात आला आहे.
मुलींसाठी खास योजना! जन्मापासून ते लग्नापर्यंतचा खर्च सरकार उचलणार
शेती व जमिनीच्या नुकसानीसाठी मदत
शेतजमिनी खरडून गेलेल्या शेतकऱ्यांना सरकारकडून हेक्टरी ₹४७,००० दिले जाणार आहेत.
तसेच नरेगा योजनेतून हेक्टरी ₹३ लाखांपर्यंत निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.
रब्बी हंगामासाठी बियाणे आणि खते खरेदीसाठीही स्वतंत्र निधी जाहीर करण्यात आला असून ₹६,१७५ कोटींची तरतूद केली आहे.
जनावरं, गोठे आणि विहिरींसाठी भरपाई
- पुरात वाहून गेलेल्या दुधाळ जनावरांसाठी ₹३७,५०० पर्यंत भरपाई.
- नुकसानग्रस्त गोठ्यांसाठी स्वतंत्र आर्थिक मदत.
- पुरात मातीने भरलेल्या विहिरींसाठी ₹३०,००० मदत जाहीर.
ही तरतूद शेतकऱ्यांच्या पशुधन व पाण्याच्या स्रोतांना पुनर्संचयित करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
विमा आणि पूरग्रस्त भागासाठी विशेष सवलती
सरकारने NDRF चे काही निकष शिथिल केले आहेत, जेणेकरून मदत जलद पोहोचेल.
- विमा असलेल्या ४५ लाख शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ₹१७,००० मदत.
- कोरडवाहू क्षेत्रासाठी ₹३५,०००, तर बागायतीसाठी ₹५०,००० पर्यंत अनुदान.
या उपाययोजनांमुळे शेतकऱ्यांना सणासुदीपूर्वी दिलासा मिळणार आहे.
अतिवृष्टीने उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने वेळेत मदतीचा हात दिला आहे. ₹३१,६२८ कोटींचं हे पॅकेज महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारं ठरणार आहे. मात्र, या मदतीचं वितरण जलद आणि पारदर्शक व्हावं, हीच सर्वांची अपेक्षा.
