PM Kisan Yojana Date Declared : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेची 20 वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. कृषी विभागाने यासंदर्भात अधिकृत घोषणा केली आहे. पात्र शेतकऱ्यांना 2,000 रुपयांचा लाभ मिळणार असून, हप्ता कोणत्या दिवशी जमा होणार याची तारीख लवकरच जाहीर होणार आहे.
नवी दिल्ली | प्रतिनिधी: देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांना दरवर्षी थेट आर्थिक मदत देणारी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (PM-KISAN) ही केंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजना आता 20व्या हप्त्याच्या उंबरठ्यावर आली आहे. ₹2,000 चा 20 वा हप्ता लवकरच पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा होणार असल्याची माहिती कृषी मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.
या महिलांना मिळणार आवश्यक वस्तू आणि साहित्य मोफत , १००% अनुदानावर लाभ
ही योजना 2019 मध्ये सुरू करण्यात आली होती आणि आतापर्यंत सरकारने 19 हप्त्यांच्या माध्यमातून देशभरातील 11 कोटींपेक्षा अधिक शेतकऱ्यांना मदत केली आहे. 20 वा हप्ता 2 ऑगस्ट 2025 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे .
कोण पात्र? आणि हप्ता मिळवण्यासाठी काय आवश्यक?
योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी खालील अटी पूर्ण केलेल्या असाव्यात:
- ई-केवायसी पूर्ण असणे अनिवार्य
- जमिनीचा सातबारा आणि आधार लिंक असलेली बँक खाती
- कृषी विभागाकडे नोंदणी
जर एखाद्या शेतकऱ्याने अद्याप ई-केवायसी केली नसेल, तर त्याला हप्ता मिळणार नाही. सरकारने स्पष्ट केले आहे की, अपात्र शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेतल्यास वसुली करण्यात येईल.
शेतकऱ्यांसाठी 200 लिटर प्रतिदिन क्षमतेचा सोलर वॉटर हिटर – 75% अनुदानावर उपलब्ध
हप्त्याची रक्कम आणि देय तारीख
₹2,000 चा 20 वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल. 20 वा हप्ता 2 ऑगस्ट 2025 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे . यापूर्वीचा 19 वा हप्ता 28 जून 2025 रोजी वितरित करण्यात आला होता.
तरी, शेतकऱ्यांनी त्यांच्या खात्यांची माहिती आणि PM-KISAN पोर्टलवरची नोंदणीची स्थिती तपासून घ्यावी.
कसे कराल स्थिती तपासणी?
शेतकरी https://pmkisan.gov.in या अधिकृत पोर्टलवर जाऊन ‘Beneficiary Status’ या पर्यायावर क्लिक करून आपली लाभ स्थिती तपासू शकतात. त्यासाठी मोबाईल नंबर किंवा आधार क्रमांक आवश्यक आहे.
PM किसान योजना ही छोट्या आणि मध्यम शेतकऱ्यांसाठी दिलासाद ठरणारी योजना आहे. 20 वा हप्ता मिळवण्यासाठी आवश्यक ती माहिती पूर्ण करून ठेवणे गरजेचे आहे. सरकारने स्पष्ट केले आहे की, फक्त पात्र शेतकऱ्यांनाच हप्ता दिला जाईल. त्यामुळे कोणतीही त्रुटी टाळण्यासाठी वेळेत प्रक्रिया पूर्ण करा.
