CLOSE AD

पीएम किसान योजनेचा २१वा हप्ता या तारखेला होणार जमा — तपासा आपले नाव लाभार्थी यादीत

PM Kisan Update : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या २१व्या हप्त्याची शेतकऱ्यांना आतुरतेने वाट पाहिली जात आहे. २०वा हप्ता २ ऑगस्टला जमा करण्यात आला होता, आणि काही राज्यांना २१वा हप्ता मिळालाही आहे.
बाकी राज्यांतील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी पैसे मिळण्याची शक्यता असून, अधिकृत घोषणा लवकरच अपेक्षित आहे.

पीव्हीसी पाईप खरेदीसाठी मिळणार 50,000 रुपये अनुदान , असा करा अर्ज

पीएम किसान योजना काय आहे?

केंद्र सरकारची प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही देशातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची योजना आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र शेतकऱ्याला वर्षाकाठी ₹६,००० रुपये, म्हणजेच दर चार महिन्यांनी ₹२,००० रुपये दिले जातात. या माध्यमातून लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य मिळते. या योजनेचा फायदा संपूर्ण भारतातील ११ कोटीहून अधिक शेतकऱ्यांना होत आहे. शेतकऱ्यांना हे पैसे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात.

२०वा हप्ता मिळाला, आता २१व्या हप्त्याची प्रतीक्षा

केंद्र सरकारने पीएम किसान योजनेचा २०वा हप्ता २ ऑगस्ट २०२५ रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला होता.
या नंतर शेतकऱ्यांचे लक्ष आता २१व्या हप्त्याकडे लागले आहे. सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार, पंजाब, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांतील शेतकऱ्यांना २१वा हप्ता देण्यात आला आहे. या राज्यांमध्ये पूरस्थितीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीची मदत म्हणून आगाऊ रक्कम देण्यात आली.

महाराष्ट्रात पुन्हा पावसाची हजेरी; १३ जिल्ह्यांना अलर्ट — हवामान खात्याचा इशारा

इतर राज्यांतील शेतकऱ्यांना कधी मिळेल हप्ता?

इतर राज्यांतील शेतकऱ्यांसाठी थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. कृषी मंत्रालयाच्या सूत्रांनुसार, दिवाळीपूर्वी पैसे जमा होण्याची शक्यता आहे. मात्र, काही शेतकऱ्यांची KYC प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसल्याने हप्ता थोडा उशिरा येऊ शकतो. सरकारकडून पडताळणी पूर्ण झाल्यानंतर नोव्हेंबरपूर्वी पैसे जमा होण्याची दाट शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे.

पात्रता आणि नियम काय आहेत?

या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी लागू आहेत —

  • शेतकऱ्याकडे २ हेक्टरपर्यंत शेतीयोग्य जमीन असावी.
  • कुटुंबातील फक्त एक सदस्य या योजनेचा लाभ घेऊ शकतो.
  • KYC प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक आहे.
    शेतकऱ्यांनी pmkisan.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपले नाव लाभार्थी यादीत आहे का हे तपासू शकतात.

👧 लेक लाडकी योजना : या योजनेअंतर्गत मुलगी असेल तर मिळेल 1 लाख 1 रुपये , असा करा अर्ज

KYC पूर्ण केल्याशिवाय पैसे मिळणार नाहीत

सरकारने योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी ई-KYC अनिवार्य केली आहे. जर शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली नसेल, तर त्यांच्या खात्यात हप्ता जमा होणार नाही. KYC करण्यासाठी शेतकऱ्यांना Aadhaar कार्ड, बँक खाते आणि मोबाईल नंबर लिंक करणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया ऑनलाइन आणि CSC केंद्रांवर उपलब्ध आहे.

यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

दिवाळीपूर्वी सरकारकडून गोड बातमीची शक्यता

यंदाची दिवाळी शेतकऱ्यांसाठी अधिक आनंदाची ठरण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारकडून मिळालेल्या संकेतांनुसार, २१वा हप्ता दिवाळीपूर्वी जमा होऊ शकतो. यामुळे लाखो शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलणार आहे. सरकारकडून अधिकृत घोषणा झाल्यानंतर हप्त्याची तारीख pmkisan.gov.in वर पाहता येईल.

Leave a Comment