Nuksan Bharpai GR : मंडळी राज्यात फेब्रुवारी ते मे 2025 या कालावधीत अनेक भागांत अवकाळी पावसाने, गारपिटीने आणि इतर हवामान बदलांमुळे शेतीचं मोठं नुकसान झालं. या नुकसानीचा आढावा घेत महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देत तब्बल 337 कोटी 41 लाख 53 हजार रुपयांची नुकसानभरपाई मंजूर केली आहे.
ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या आधार लिंक असलेल्या खात्यांमध्ये DBT (डायरेक्ट बँक ट्रान्सफर) प्रणालीद्वारे लवकरच जमा केली जाणार आहे. शासन निर्णय 22 जुलै 2025 रोजी जाहीर करण्यात आला आहे.
मागेल त्याला शेततळे योजना : ऑनलाईन अर्ज सुरु , जाणून घ्या सविस्तर माहिती
संपूर्ण राज्यभरात मदतीचा लाभ
राज्यभरातील विविध विभागांमध्ये नुकसान भरपाईची रक्कम विभागली गेली आहे. प्रत्येक विभागातील शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानीच्या प्रमाणानुसार मदत मिळणार आहे.
छत्रपती संभाजीनगर विभागातील शेतकऱ्यांसाठी 57.45 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या विभागात लातूर, बीड, नांदेड, धाराशिव, हिंगोली, परभणी आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांचा समावेश आहे.
पुणे विभागातील शेतकऱ्यांना 81.27 कोटी रुपये मिळणार आहेत. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांतील सुमारे 1 लाख 7 हजार शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे.
🐐 शेळीपालन योजनेअंतर्गत काही नागरिकांना मिळणार 90% अनुदान – जाणून घ्या संपूर्ण माहिती
नाशिक विभागात 1 लाख 5 हजार शेतकऱ्यांसाठी 85.67 कोटी रुपयांची मदत मंजूर झाली आहे. यात नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहमदनगर जिल्हे समाविष्ट आहेत.
कोकण विभागातील शेतकऱ्यांसाठी 9.38 कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली असून, याचा लाभ सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांना होणार आहे.
अमरावती विभागातील शेतकऱ्यांसाठी 66.19 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे. अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम आणि बुलढाणा जिल्ह्यांतील सुमारे 55 हजार शेतकऱ्यांना याचा फायदा मिळेल.
नागपूर विभागातील भंडारा, नागपूर, गोंदिया, वर्धा, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांतील सुमारे 50 हजार शेतकऱ्यांसाठी 34.91 कोटी रुपये मंजूर झाले आहेत.
👩🦰 या महिलांना मिळणार 5 लाख रुपयांपर्यंत अनुदान – जाणून घ्या कोण पात्र आहे आणि अर्ज कसा करावा!
शासनाने लवकरच पात्र शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करण्याचे संकेत दिले आहेत. संबंधित शेतकऱ्यांनी आपली KYC प्रक्रिया पूर्ण करून ठेवावी, जेणेकरून नुकसान भरपाईची रक्कम त्यांच्या खात्यात अडथळ्याविना जमा होऊ शकेल.
अधिकृत माहिती कुठे पाहावी?
नुकसानभरपाईसंदर्भातील अधिकृत शासन निर्णय पाहण्यासाठी शेतकऱ्यांनी महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळाला maharashtra.gov.in भेट द्यावी.
