CLOSE AD

हवामान अंदाज : राज्यात या जिल्ह्यात पडणार मुसळधार पाऊस

Monsoon Update : मित्रांनो महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय होत असून हवामान विभागाने पुढील काही दिवसांत पावसाचा जोर वाढण्याचा इशारा दिला आहे. पुणे शहर तसेच कोकणातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर लक्षणीयरीत्या वाढला आहे. बुधवारी रात्री पुणे आणि कोकणात काही ठिकाणी मुसळधार पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला असला, तरी पुढील काही दिवस हवामान आणखी अस्थिर राहण्याची शक्यता आहे.

घाटमाथ्यालगतच्या जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा

रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग तसेच पुणे, सातारा, कोल्हापूर आणि नाशिक या घाटमाथ्यालगतच्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता असून, पुण्यात खडकवासला धरण क्षेत्रात झालेल्या पावसामुळे पाटबंधारे विभागाने रात्री १२ वाजल्यापासून ६,४५१ क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. हा विसर्ग पावसाच्या तीव्रतेनुसार कमी-अधिक केला जाणार आहे.

Us Todani Yantra Machine Yojana 2023| ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना 2023.

६ जुलैपासून पावसाचा जोर वाढणार

हवामान विभागाचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ के. एस. होसाळीकर यांनी सोशल मीडियावर माहिती देताना सांगितले की, ६ जुलैपासून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पाऊस पुन्हा जोमात पडेल. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये ३ ते ६ जुलै दरम्यान मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. यानंतर मराठवाडा आणि विदर्भातही पावसाची सक्रियता वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

शेतकऱ्यांसाठी दिलासादायक पावसाचा अंदाज

विदर्भात गुरुवारी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असून, काही भागांत ढगाळ वातावरण राहणार आहे. मराठवाड्यातील शेतकरी वर्ग या पावसाची आतुरतेने वाट पाहत असल्याने, ६ जुल्यानंतर पावसाचा जोर वाढणे ही एक सकारात्मक बाब ठरणार आहे.

Shetkaryana 600 Kotinchi Madat | शेतकऱ्यांना 600 कोटींची मदत, रक्कम थेट खात्यात जमा होणार.

पुणे परिसरात धरणक्षेत्रात पडणाऱ्या जोरदार पावसामुळे पाण्यात माती आणि गाळ मिसळल्याने पाणी गढूळ होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नागरिकांकडून पाण्याच्या गुणवत्तेबाबत तक्रारी वाढल्या आहेत. महापालिकेने जलशुद्धीकरण प्रक्रिया अधिक तीव्र केली आहे. नागरिकांनी पाणी उकळून, गाळून प्यावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

नाशिक व पिंपरी-चिंचवड परिसरातही दिलासादायक स्थिती

नाशिक जिल्ह्यातील गंगापूर धरण क्षेत्रात संततधार सुरु असून, सध्या २,१३३ क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पवना धरण क्षेत्रातही समाधानकारक पावसाने सुरुवात केली असून, सध्या धरण ६६.४९ टक्के भरले आहे. त्यामुळे पाणीटंचाईची भीती काही प्रमाणात दूर झाली आहे.

Leave a Comment