Monsoon Rain High Alert : मित्रांनो राज्यभर मान्सूनची सक्रियता वाढल्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक भागांत पावसाचा जोर वाढला आहे. हवामान विभागाने काही जिल्ह्यांसाठी अतिवृष्टीचा ऑरेंज अलर्ट आणि काही जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे. नागरिकांनी आणि प्रशासनाने आवश्यक काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
कमी दाबाच्या पट्ट्याचा परिणाम
पश्चिम बंगाल आणि आजूबाजूच्या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे राज्यात पावसाच्या सरी वाढल्या आहेत. ही प्रणाली पुढील २४ तासांत झारखंड आणि छत्तीसगडकडे सरकण्याची शक्यता आहे. अरबी समुद्र ते बंगालच्या उपसागरापर्यंत याचा प्रभाव जाणवत आहे. दक्षिण गुजरात आणि दक्षिण कर्नाटकच्या किनारपट्टीला समांतर कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्यामुळे पावसाचे वातावरण अधिक तीव्र झाले आहे.
पंतप्रधान उज्ज्वला योजना : आता घरातील दोन महिलांना मिळणार मोफत गॅस सिलिंडर
घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस
कोकण आणि घाटमाथ्यावरील भागांत रविवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. पालघर जिल्ह्यातील जव्हार आणि मोखेडा येथे सर्वाधिक १९० मिमी पावसाची नोंद झाली. कोकणातील इतर भागांमध्येही १०० मिमीपेक्षा अधिक पाऊस पडला आहे. नद्या आणि ओढ्यांना पूर येण्याची शक्यता असल्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
ऑरेंज अलर्ट असलेले भाग
रायगड, रत्नागिरी, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा तसेच विदर्भातील अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागांत काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे आणि नदीकाठच्या गावांना पूरपरिस्थितीचा धोका आहे.
टोकन यंत्र अनुदान योजना सुरु , शेतकऱ्यांना मिळणार अनुदान , असा करा अर्ज
येलो अलर्ट असलेले भाग
पालघर, ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग, नंदूरबार, धुळे, नाशिक घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, अकोला, यवतमाळ, जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांत येलो अलर्ट जारी केला आहे. या भागांत मध्यम ते जोरदार पावसाच्या सरींसह विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी वाऱ्याचा वेग वाढण्याची शक्यता आहे.
तापमानाची नोंद
परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात राज्यातील सर्वाधिक ३२.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पावसाचा जोर असला तरी काही भागांत उष्णतेची तीव्रता टिकून आहे.
