CLOSE AD

महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर! पुढील ५ दिवस कोणत्या जिल्ह्यांना यलो अलर्ट, IMD चा इशारा वाचा सविस्तर

Maharashtra weather update : महाराष्ट्रात ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पावसाची उघडीप असून पुढील ४ ते ५ दिवसांत पावसाचा जोर हळूहळू वाढणार आहे. विदर्भ, मराठवाडा आणि कोकणात यलो अलर्ट जारी करण्यात आले असून काही भागात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

९५२६ महिला कर्मचाऱ्यांचा लाडकी योजनेत गैरवापर! सरकारने केली मोठी कारवाई, वसुली आणि दंडाची तयारी

चक्राकार वाऱ्यांचा प्रभाव: राज्यातील पावसाचे चित्र बदलणार

जुलै महिन्याच्या अखेरीस महाराष्ट्रात झालेल्या दमदार पावसानंतर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात वातावरणात काहीसा बदल जाणवत आहे. सध्या राज्यात काही भागांमध्ये उघडीप असून काही जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. मात्र हवामान विभागाने दिलेल्या नव्या अंदाजानुसार, पुढील काही दिवसांत राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे.

अरबी समुद्राच्या दक्षिण भागात निर्माण झालेल्या चक्राकार वाऱ्यांमुळे पुन्हा एकदा पावसासाठी पोषक हवामान तयार झाले आहे. या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना IMD (हवामान विभाग) ने यलो अलर्ट जारी केला आहे.

पंतप्रधान उज्ज्वला योजना : आता घरातील दोन महिलांना मिळणार मोफत गॅस सिलिंडर

पुढील दिवसांतील जिल्हानिहाय पावसाचा अंदाज

२ ऑगस्ट:

वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली — यलो अलर्ट

३ ऑगस्ट:

तेच जिल्हे यलो अलर्टमध्ये कायम; तसेच कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड — हलक्या सरींची शक्यता

४ ऑगस्ट:

सोलापूर, लातूर, नांदेड, हिंगोली, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली — यलो अलर्ट
तळ कोकण, पुणे, सातारा, कोल्हापूर — हलक्या सरी

संजय गांधी निराधार योजना : या योजनेनुसार निराधार व्यक्तींना दरमहा ₹१५०० अनुदान मिळणार

५ ऑगस्ट:

लातूर, धाराशिव, सोलापूर, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली — यलो अलर्ट

६ ऑगस्ट:

वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर — यलो अलर्ट

ढगाळ हवामान व हलक्या सरी

छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, परभणी, हिंगोली, नांदेड आणि लातूर जिल्ह्यांमध्ये आकाश ढगाळ राहण्याची शक्यता असून काही भागांमध्ये हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे.

या लाभार्थ्यांना स्कुटी घेण्यासाठी मिळणार 100% अनुदान , असा करा ऑनलाईन अर्ज

पूर्व विदर्भात सतर्कतेचा इशारा

हवामान विभागाने स्पष्टपणे सांगितले आहे की, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये मुसळधार सरी, विजांचा कडकडाट आणि वाऱ्याचा जोर जाणवण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

शेती आणि दैनंदिन जीवनावर प्रभाव

या पावसामुळे शेतकऱ्यांना पेरणीसाठी पूरक हवामान मिळेल. मात्र मुसळधार पावसामुळे जमिनीत निचरा होण्यास विलंब होऊ शकतो, त्यामुळे शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज पाहून पुढील टप्प्याचे नियोजन करावे.

Leave a Comment