MahaDBT Lottery List : महाडीबीटी कृषी यांत्रिकीकरण योजनेची नवीन सोडत यादी जाहीर झाली आहे. निवड झालेल्या शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे पोर्टलवर अपलोड करावीत. यादीमध्ये राज्यभरातील हजारो शेतकऱ्यांची निवड झाली असून, त्यांना पुढील प्रक्रिया पूर्ण करून अनुदान रक्कम मिळवता येणार आहे.
या योजनेअंतर्गत मुलींच्या विवाहासाठी 51 हजार रुपये मिळणार , पहा सविस्तर माहिती
नवीन यादी जाहीर – शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची प्रक्रिया सुरू
राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! महाडीबीटी कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत दिनांक १ ऑगस्ट २०२५ रोजी नवीन सोडत यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत राज्यभरातील हजारो पात्र शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे. यादी mahadbt.maharashtra.gov.in पोर्टलवर उपलब्ध आहे.
निवड झालेल्या शेतकऱ्यांना आता पुढील टप्प्यासाठी महत्वाची कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहेत. यात फार्मर आयडी, सातबारा, होल्डिंग, यंत्राचे कोटेशन, टेस्ट रिपोर्ट आणि ट्रॅक्टर असलेल्या बाबतीत आरसी बुक आवश्यक आहे. ही सर्व माहिती पोर्टलवर वेळेत भरल्यानंतर पूर्वसंमती, मान्यता व अनुदान वितरणाचे टप्पे पूर्ण होतील.
राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना : कुटुंबाला केंद्र शासनाकडून मिळणार ₹20,000 आर्थिक सहाय्य
काय कागदपत्रे आवश्यक?
सोडत यादीत नाव आल्यावर खालील कागदपत्रांची आवश्यकता आहे:
- फार्मर आयडी
- सातबारा उतारा (७/१२)
- होल्डिंग प्रमाणपत्र
- कोटेशन व टेस्ट रिपोर्ट (यंत्रासाठी)
- आरसी बुक (जर ट्रॅक्टरचलित अवजार असेल तर)
जर ट्रॅक्टर यंत्रासाठी लाभ मिळवायचा असेल, तर ट्रॅक्टर शेतकऱ्याच्या किंवा त्याच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर असणे आवश्यक आहे. यात आई, वडील किंवा अविवाहित अपत्य यांचा समावेश होतो.
👧 लेक लाडकी योजना : या योजनेअंतर्गत मुलगी असेल तर मिळेल 1 लाख 1 रुपये , असा करा अर्ज
जिल्ह्यानिहाय निवड झालेल्या शेतकऱ्यांची संख्या
| जिल्हा | निवड झालेल्या शेतकऱ्यांची संख्या |
|---|---|
| बुलढाणा | १४६५ |
| सोलापूर | ८६६ |
| लातूर | ८१८ |
| अहमदनगर (अहिल्यानगर) | ७९६ |
| जळगाव | ६२० |
| सांगली | ६०९ |
| नाशिक | ४५८ |
| परभणी | ४५५ |
| जालना | ३८५ |
| सिंधुदुर्ग | ३२४ |
| धुळे | ३१७ |
| यवतमाळ | ३१४ |
| भंडारा | २९० |
| पुणे | १६९ |
| नांदेड | २६२ |
| सातारा | २३३ |
| चंद्रपूर | २२६ |
| गोंदिया | २१६ |
| हिंगोली | १५२ |
| वर्धा | १५१ |
| धाराशिव | १२७ |
| बीड | १८९ |
| कोल्हापूर | ८५ |
| नागपूर | ८४ |
| छ. संभाजीनगर | ५४ |
| पालघर | ५० |
| रायगड | ४२ |
| ठाणे | ३९ |
| नंदुरबार | ३५ |
| अमरावती | २५ |
| वाशिम | २१ |
| अकोला | १७ |
| रत्नागिरी | १२ |
| गडचिरोली | ०१ |
शेतकऱ्यांना काय करावे लागेल?
तुमचं नाव सोडत यादीत आल्यास या लिंकवर क्लिक करून संपूर्ण यादी तपासा. नंतर, संपूर्ण कागदपत्रे अपलोड करा व पोर्टलवरील सर्व टप्पे पूर्ण करा. उशीर झाल्यास अनुदान प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो.
