Ladki Bahin Yojana Oct Nov Month : ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ अंतर्गत महिलांसाठी आनंदाची बातमी आहे! शासनाच्या सूत्रांनुसार, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे हप्ते एकत्रितपणे जमा होण्याची शक्यता आहे. म्हणजेच लाभार्थी महिलांच्या खात्यात ₹३,००० रुपये येऊ शकतात. निवडणूक आचारसंहितेपूर्वी निधी वितरणाची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.
लाडकी बहीण योजनेसाठी सरकारने लागू केला नवीन नियम Ladki Bahin Yojana New Rule
महिलांसाठी आनंदाची बातमी – हप्ता लवकरच खात्यात
राज्यातील लाखो लाभार्थी महिला ‘लाडकी बहीण योजना’ अंतर्गत ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहेत. मात्र, अद्याप त्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे हप्ते एकत्रितपणे देण्याचा विचार शासनस्तरावर सुरू आहे. त्यामुळे महिलांच्या खात्यात एकाचवेळी ₹३,००० जमा होऊ शकतात.
आचारसंहितेपूर्वी निधी वितरणाची तयारी
नोव्हेंबर महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. एकदा आचारसंहिता लागू झाल्यानंतर शासन कोणताही आर्थिक लाभ वितरित करू शकत नाही. त्यामुळे शासन प्रशासन निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्रितपणे देण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे.
एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त! जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यातील आजचे नवीन दर
२ कोटी लाभार्थ्यांना मिळू शकतो ₹३,००० चा डबल हप्ता
‘लाडकी बहीण योजना’ अंतर्गत राज्यभरातील सुमारे २ कोटी महिलांना दरमहा ₹१,५०० रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते. सध्या निधी मंजुरी आणि पडताळणी प्रक्रिया सुरू असून, पुढील १५ दिवसांत निधी वितरण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या दोन्ही महिन्यांचा एकत्रित हप्ता ₹३,००० रुपयांचा असेल.
निवडणुकांमुळे दोन महिन्यांचा एकत्रित हप्ता
नोव्हेंबर ते जानेवारी या कालावधीत ३२ जिल्हा परिषद, ३३१ पंचायत समित्या, २८९ नगरपालिका आणि २९ महापालिका निवडणुका होणार आहेत. या काळात आचारसंहिता लागू असल्यामुळे शासन कोणतीही आर्थिक मदत देऊ शकणार नाही. त्यामुळे महिलांना अडचण येऊ नये म्हणून ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे एकत्र दिले जाण्याची शक्यता आहे.
पेट्रोल-डिझेल दरात मोठी घसरण! जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे ताजे दर
शासनाचा उद्देश – महिलांना सतत आर्थिक सहाय्य
लाडकी बहीण योजनेचा उद्देश महिलांना आर्थिक स्थैर्य आणि स्वावलंबन देणे हा आहे. त्यामुळे शासन कोणत्याही परिस्थितीत लाभार्थी महिलांना हप्त्यापासून वंचित ठेवणार नाही, असे अधिकृत सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. आर्थिक मंजुरीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर महिलांच्या खात्यात थेट पैसे जमा केले जातील.
हप्ता वितरणाबाबत निर्णय या आठवड्यात
राज्याच्या महिला व बालविकास विभागाकडून दोन्ही महिन्यांचा निधी एकत्रित करण्याचा प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठवण्यात आला आहे. या प्रस्तावावर या आठवड्यात अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लाभार्थींनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत घोषणेची वाट पहावी.
