Ladki Bahin Yojana Notice Send : लाडकी बहीण योजनेत अपात्र पुरुषांनी लाभ घेतल्याचा प्रकार उघड झाला आहे. राज्यातील १४,००० पेक्षा जास्त पुरुषांनी या योजनेचा गैरफायदा घेतला आहे. आता सरकारकडून नोटीस बजावून एका महिन्याची मुदत देत पैसे परत मागवले जात आहेत. सोलापूरमध्ये ४३० जणांना नोटीस देण्यात आली आहे.
राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेत मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. ज्या योजनेचा उद्देश २१ ते ६५ वयोगटातील गरजू महिलांना दरमहा ₹१५०० ची आर्थिक मदत देण्याचा होता, त्या योजनेचा गैरफायदा तब्बल १४ हजारांहून अधिक पुरुषांनी घेतल्याचे समोर आले आहे. सरकार आता अशा अपात्र लाभार्थ्यांविरुद्ध कठोर कारवाईच्या मूडमध्ये आहे.
या रेशन कार्ड धारकांना आता धान्या ऐवजी थेट रोख रक्कम वाटप सुरु , नवीन GR जाहीर
सोलापूर जिल्ह्यातील ४३० जणांनी अवैधपणे ही रक्कम घेतल्याचे निष्पन्न झाले असून, त्यांच्याकडून ₹२३.१० कोटींची वसुली होणार आहे. या भावांना घरी नोटीस पाठवण्यात आली असून, एक महिन्याची मुदत दिली आहे. जर वेळेत पैसे परत न केल्यास, पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा अधिकाऱ्यांनी दिला आहे.
या योजनेत महिलांसाठी ठरवलेले निकष पाळले गेले नाहीत. अनेक कुटुंबांतील दोनपेक्षा जास्त महिलांनी लाभ घेतला असून, काहींनी चुकीचे रेशन कार्ड दाखवून पात्र असल्याचे भासवले. याशिवाय वयोमर्यादा न पाळणाऱ्या महिलांनाही लाभ मिळाल्याचे समोर आले आहे.
इयत्ता १० वी व १२ वी मध्ये ५०% किंवा अधिक गुण प्राप्त विद्यार्थ्यांना मिळणार ₹10,000
महत्वाचे म्हणजे, ४२ लाख महिलाही या योजनेसाठी अपात्र ठरल्या आहेत. त्यांच्याही अर्जांची सखोल पडताळणी सुरू असून, प्रत्येक जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांकडून तपासणी केली जात आहे. ज्या महिलांनी चुकीच्या माहितीसह अर्ज केला आहे, त्यांचा लाभ रद्द केला जाईल.
शासनाच्या आदेशानुसार, बँकेच्या माध्यमातून या लाभार्थ्यांचे व्यवहार थांबवले जाणार आहेत. जर हे पुरुष किंवा अपात्र महिला पैसे परत करत नसतील, तर त्यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया देखील हाती घेतली जाईल.
सरकारची ही कारवाई निवडणूकपूर्व आश्वासनांपेक्षा जनतेला जबाबदारीची जाणीव करून देणारी ठरत आहे. योजना गरजूंंसाठी आहे, त्याचा गैरवापर करणाऱ्यांना माफ नाही – हे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.
