CLOSE AD

लाडकी बहिण योजना : लाडक्या बहिणींना महत्त्वाची बातमी , जाणून घ्या सविस्तर माहिती

Ladki Bahin Yojana : मंडळी राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील पात्र महिलांना जून 2025 महिन्याचे अनुदान देण्यासाठी अनुसूचित जाती घटकासाठी असलेला 410 कोटी 30 लाख रुपये निधी वळवण्यास मंजुरी दिली आहे. त्यानंतर सामाजिक न्याय विभागाने निधी वर्ग करण्यासंबंधीचा शासन निर्णय (जीआर) जारी केला आहे.

योजनेसाठी मंजूर निधी आणि वितरण

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी अनुसूचित जाती घटक कार्यक्रमांतर्गत 2025-26 आर्थिक वर्षात एकूण 3960 कोटी रुपये नियतव्यय मंजूर आहे. वित्त विभागाच्या 7 एप्रिल 2025 रोजीच्या परिपत्रकानुसार निधी वितरणाची कार्यपद्धती ठरवण्यात आली आहे. त्यानुसार जून महिन्याचा हप्ता अदा करण्यासाठी 410 कोटी 30 लाख रुपये निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर वर्ग करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.

मागेल त्याला शेततळे योजना : ऑनलाईन अर्ज सुरु , जाणून घ्या सविस्तर माहिती

खर्चावर नियंत्रण आणि अहवाल

निधी खर्च करताना संबंधित अधिकारी आणि विभागप्रमुखांनी महाराष्ट्र अर्थसंकल्प नियमपुस्तिका आणि वित्तीय अधिकार नियमपुस्तिकेतील नियमांचे काटेकोर पालन करावे. खर्च करताना काटकसर आणि शासकीय धोरणाचे पालन करणे बंधनकारक आहे. मंजूर आराखड्यानुसार याच आर्थिक वर्षात निधीचा विनियोग होईल याची दक्षता घ्यावी. तसेच खर्चाचा तपशील, उद्दिष्ट पूर्तता अहवाल, निधी उपयोगिता प्रमाणपत्र इत्यादी दर महिन्याच्या 10 तारखेपर्यंत संबंधित विभागांना पाठवणे आवश्यक आहे.

लाभार्थ्यांची नोंद आणि देखरेख

अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील लाभार्थी महिलांची संख्या विभागाने नोंदवावी. योजनेतील निधीचा विनियोग फक्त त्या घटकांतील लाभार्थींकरिता होईल याची खातरजमा करण्याची जबाबदारी विभागावर आहे. तसेच संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेच्या लाभार्थींना या योजनेचा दुबार लाभ मिळणार नाही याची तपासणी करणे आवश्यक आहे.

Crop Insurance : घरबसल्या मोबाईलवरून असा भर पीक विमा , जाणून घ्या सविस्तर

योजनेची पार्श्वभूमी आणि आतापर्यंतची अंमलबजावणी

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरू करण्यात आली होती. या योजनेचा पहिला शासन निर्णय 29 जून 2024 रोजी काढण्यात आला होता. आजपर्यंत लाभार्थी महिलांना एकूण 11 महिन्यांचे हप्ते म्हणजेच 16,500 रुपये मिळाले आहेत. मे महिन्याचा हप्ता 7 जूनच्या दरम्यान खात्यात जमा झाला होता. आता जून महिन्याच्या हप्त्याची रक्कम कधी मिळणार हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केले आहे.

विशेष लाभार्थी महिलांना मिळणारे अनुदान

या योजनेत ज्या महिलांना पीएम किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी सन्मान निधीचा लाभ मिळतो, त्या महिलांना दरमहा 500 रुपये अनुदान दिले जाते. शासनाच्या धोरणानुसार एकाच वर्षात एकूण 18,000 रुपये मिळावेत हे उद्दिष्ट आहे. दोन्ही शेतकरी योजनांमधून मिळणारे 12,000 रुपये वजा जाता, उर्वरित 6,000 रुपये मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतून दिले जातात. अशा लाभार्थी महिलांची संख्या सुमारे 7 ते 8 लाख आहे.

Leave a Comment