CLOSE AD

लाडकी बहीण योजना : मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा , सरकारची बहिणींसाठी मोठी भेट

Ladki Bahin Yojana New Announcement : नमस्कार मित्रांनो गेल्या वर्षी शिंदे सरकारने मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण ही नवी योजना सुरू केली. या योजनेचा उद्देश होता राज्यातील महिलांना आर्थिक मदत करून त्यांना सशक्त बनवणे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जात आहेत. आतापर्यंत जुलै 2024 पासून सुरू झालेल्या या योजनेचे 12 हप्ते लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत.

प्रधानमंत्री स्वनिधी योजनेअंतर्गत तुम्हाला मिळणार ₹५०,००० पर्यंतचे कर्ज

नवा हप्ता कधी मिळणार? महिलांमध्ये प्रश्न उपस्थित

सध्या या योजनेच्या जुलै 2025 च्या हप्त्याबाबत महिलांमध्ये उत्सुकता वाढली आहे. सोशल मीडियावर आणि विविध माध्यमांमध्ये या विषयावर चर्चा सुरू आहेत. अनेक लाडक्या बहिणी विचारत आहेत की, जुलैचा हप्ता कधी जमा होईल? आणि यंदा जुलै व ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्र मिळू शकतात का?

रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर दुहेरी लाभाची शक्यता

यावर्षी 9 ऑगस्टला रक्षाबंधन आहे. या सणाच्या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकार काही विशेष घोषणा करू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मागील वर्षीही शिंदे सरकारने पहिल्या टप्प्यात जुलै आणि ऑगस्टचे हप्ते एकत्रच लाभार्थींच्या खात्यात जमा केले होते. त्यामुळे यावर्षीही अशाच पद्धतीने दोन्ही महिन्यांचे पैसे एकत्र मिळण्याची शक्यता आहे.

लेक लाडकी योजना : या योजनेअंतर्गत मुलगी असेल तर १ लाख रुपये मिळणार …

मीडिया रिपोर्टनुसार, जुलै व ऑगस्टचे हप्ते रक्षाबंधनाच्या दिवशी किंवा त्याच्या आधी – म्हणजेच ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात – मिळू शकतात, असा अंदाज आहे.

अधिकृत घोषणा अद्याप नाही

मित्रानो याबाबत अद्याप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा इतर मंत्र्यांकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. प्रशासनाकडूनही या संदर्भात कुठलीही स्पष्टता आलेली नाही. त्यामुळे हप्ता कधी आणि कशा स्वरूपात मिळणार, हे सध्या तरी प्रतीक्षेचेच आहे.

लाडक्या बहिणींनी थोडा संयम ठेवून अधिकृत घोषणेची वाट पाहावी लागेल. सरकारकडून नेहमीप्रमाणे मदतीचा हात पुढे केला जाईल, अशी अपेक्षा लाभार्थींमध्ये आहे.

Leave a Comment