Ladki Bahin Yojana Money Deposit : मंडळी राज्यातील लाखो महिलांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत जून महिन्याचा हप्ता आजपासून महिलांच्या बँक खात्यांत जमा होऊ लागला आहे. त्यामुळे अनेक महिलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र पैसे जमा झाले की नाही हे तपासून पाहणे महत्त्वाचे आहे. यासाठी संपूर्ण माहिती वाचा.
लाडकी बहीण योजना – निधी जमा होण्यास सुरुवात
महिलांना आर्थिक आधार देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ही योजना सुरू केली आहे. काही काळ निधीअभावी जून महिन्याचा हप्ता रखडला होता. मात्र, आता शासनाने निधीची अडचण दूर करत 410 कोटी 30 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे आणि जून महिन्याचा हप्ता वितरित करण्यास सुरुवात केली आहे. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सोशल मीडियाद्वारे याची अधिकृत माहिती दिली आहे.
🐐 शेळीपालन योजनेअंतर्गत काही नागरिकांना मिळणार 90% अनुदान – जाणून घ्या संपूर्ण माहिती
सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यांमध्ये हा निधी जमा होतो आहे. यामुळे महिलांना दिलासा मिळाला आहे.
जुलै हप्त्याबाबत माहिती
याआधी चर्चा होती की जून आणि जुलै हप्ता एकत्रित दिला जाईल. मात्र अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे की, सध्या केवळ जून महिन्याचा हप्ता दिला जात आहे. जुलै महिन्याचा हप्ता ऑगस्ट महिन्यात वितरित केला जाईल अशी शक्यता आहे.
योजनेमध्ये पारदर्शकता राहावी यासाठी शासनाने अपात्र लाभार्थ्यांविरोधात कारवाई केली आहे. तपासणीत 2289 सरकारी महिला कर्मचारी अपात्र आढळल्या असून त्यांना योजनेतून वगळण्यात आले आहे. अदिती तटकरे यांनी विधानसभेत यासंदर्भात लेखी उत्तर दिले आहे. अपात्र महिलांना योजनेतून वगळण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळणार ? जाणून घ्या सविस्तर माहिती
महिलांसाठी दिलासादायक पाऊल
राज्यातील महिलांच्या खात्यात जून महिन्याचे दीड हजार रुपये जमा झाले आहेत. ही रक्कम गरजेच्या वेळी उपयोगी ठरेल आणि अनेक महिलांसाठी महत्त्वाचा आर्थिक आधार ठरेल. महायुती सरकारच्या दृढ निश्चयामुळे ही योजना यशस्वीपणे पुढे जात आहे आणि महिलांना वेळच्यावेळी लाभ मिळावा यासाठी प्रयत्न सुरूच आहेत.
टीप — खात्यात निधी जमा झाला आहे की नाही हे तपासण्यासाठी संबंधित बँकेशी संपर्क साधावा किंवा बँक खाते तपासा.