CLOSE AD

लाडकी बहीण योजना : लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹१५०० जमा होण्यास सुरुवात; लगेच तपासा आपले खाते

Ladki Bahin Yojana Money Deposit Sept Month महाराष्ट्रातील लाखो महिलांसाठी आनंदाची बातमी आहे! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. सप्टेंबर महिन्याचा ₹१५०० रुपयांचा हप्ता अनेक लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झाला असून, दिवाळीपूर्वी सर्व पात्र महिलांना रक्कम मिळणार असल्याची माहिती महिला व बालविकास विभागाने दिली आहे.

🚫 लाडकी बहीण योजनेच्या अपात्र लाभार्थ्यांची यादी जाहीर – तुमचं नाव आहे का? तातडीने तपासा!

महाराष्ट्रातील महिलांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबर महिन्याचा ₹१५०० रुपयांचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील पात्र महिलांच्या खात्यात पैसे टप्प्याटप्प्याने वर्ग केले जात आहेत. ही मदत दिवाळीपूर्वी मिळाल्याने महिलांच्या चेहऱ्यावर समाधान झळकत आहे. योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत लाखो महिलांनी या उपक्रमाचा लाभ घेतला आहे.

सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा

महिला व बालविकास विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सप्टेंबर महिन्याचा हप्ता १० ऑक्टोबरपासून लाभार्थींच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. राज्य सरकारने आवश्यक निधी मंजूर करून वित्तीय प्रक्रिया पूर्ण केली आहे.
दरम्यान, अनेक महिलांना मोबाईलवर बँकेकडून “₹१५०० जमा” असा मेसेज आला आहे. ज्यांच्या खात्यात अद्याप पैसे आले नाहीत, त्या महिलांना पुढील काही दिवसांत हप्ता मिळेल.

लाडकी बहीण योजना : ऑक्टोबर महिन्याची पहिली लाभार्थी यादी जाहीर, पाहा तुमचं नाव!

दिवाळीपूर्वी आनंदाची भेट

या महिन्याचा हप्ता दिवाळीपूर्वी मिळाल्याने महिलांच्या आनंदाला पारावार उरलेला नाही. महिलांनी सांगितले की, “ही रक्कम आम्हाला छोट्या खर्चांसाठी मोठी मदत ठरते.” या योजनेमुळे महिलांना स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न होत आहे.
सरकारने दिलेली ही दिवाळीपूर्व भेट महिलांसाठी आर्थिक दिलासा ठरली आहे.

ई-केवायसी केलेल्यांनाच लाभ

महत्वाचे म्हणजे, ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेल्यांनाच हप्ता मिळत आहे. राज्यभरात अजूनही काही महिलांनी केवायसी केली नसल्याने त्यांचा हप्ता थांबवण्यात आला आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की,
“सर्व महिलांनी ladkibahin.maharashtra.gov.in या वेबसाइटवर जाऊन केवायसी पूर्ण करावी, जेणेकरून पुढील हप्ते वेळेवर मिळतील.”

शेतकऱ्यांना दिलासा! उसासाठी ₹१.८० लाख आणि सोयाबीनसाठी ₹७५ हजार पीककर्ज

लाखो महिलांना थेट फायदा

या योजनेचा फायदा राज्यातील २.५ कोटीहून अधिक महिलांना मिळत आहे. त्यापैकी पहिल्या १४ महिन्यांत नियमित हप्ते देण्यात आले आहेत. राज्य सरकारचा उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल, विधवा, घटस्फोटित, तसेच दारिद्र्यरेषेखालील महिलांना आर्थिक मदत करून स्वावलंबनाचा मार्ग दाखवणे आहे. या योजनेमुळे ग्रामीण भागात महिलांचा आत्मविश्वास वाढल्याचे दिसत आहे.

खाते तपासण्याची प्रक्रिया

१️. आपल्या बँकेच्या मोबाईल अॅपमध्ये लॉगिन करा
२️. ‘Transaction History’ पर्यायावर क्लिक करा
३️. ₹१५०० जमा झाले का ते तपासा
४️. किंवा जवळच्या बँकेत जाऊन खात्री करा
५️. जर रक्कम जमा झाली नसेल तर ई-केवायसी स्थिती तपासा

Leave a Comment