Ladki Bahin Yojana Latest News : नमस्कार मित्रांनो गेल्या वर्षी जुलै महिन्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरू करण्यात आली आणि तेव्हापासून राज्यातील 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपयांचा आर्थिक लाभ मिळत आहे. आतापर्यंत या योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात 12 हप्ते जमा करण्यात आले आहेत.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेली सुरुवात
ही योजना जाहीर झाली तेव्हा विधानसभा निवडणुका जवळ आल्या होत्या. त्यामुळे त्यावेळी अर्ज केलेल्या बहुतांश महिलांना कोणतीही खास पडताळणी न करता थेट लाभ देण्यात आला. त्या वेळी सरकारने सर्व महिलांना थेट लाभ ही भूमिका घेतली होती.
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना – ₹30 लाखांचा निधी मंजूर , या शेतकऱ्यांना मिळणार लाभ
आता काटेकोर पडताळणीमुळे नाराजी
सध्या मात्र सरकारकडून लाभार्थींच्या अर्जांची काटेकोर तपासणी सुरू झाली आहे. त्यामुळे अनेक महिलांना वेगवेगळ्या कारणांमुळे योजनेतून वगळले जात आहे. कुणी दुसऱ्या योजनांचा लाभ घेत असल्यामुळे, कुणाच्या घरी चारचाकी आहे म्हणून तर कुणाचे वय 65 वर्षांपेक्षा अधिक असल्यामुळे अर्ज बाद झाले आहेत.
या प्रक्रियेमुळे राज्यभरात लाखो महिलांमध्ये सरकारविरोधात नाराजीचे वातावरण आहे. महिलांचा असा आरोप आहे की सुरुवातीला लाभ दिला आणि आता अचानक बंद केला जात आहे. ही नाराजी सरकारसाठी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अडचण ठरू शकते.
या रेशन कार्ड धारकांना आता धान्या ऐवजी थेट रोख रक्कम वाटप सुरु , नवीन GR जाहीर
सरकारकडून धोरणात बदल
ही वाढती नाराजी लक्षात घेता, आता सरकारकडून धोरणात बदल करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुका होईपर्यंत नो चाळण, नो गाळण हे धोरण स्वीकारले आहे. म्हणजे स्थानिक निवडणुका होईपर्यंत योजनेतील अर्जांची तपासणी थांबवण्यात आली आहे आणि महिलांना पुन्हा नियमितपणे हप्ते दिले जातील.
किती महिलांना वगळण्यात आलं?
सरकारी आकडेवारीनुसार जून महिन्यात तब्बल 12 लाख 72 हजार महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. यामध्ये संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या 2.3 लाख महिला, 65 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या 1.1 लाख महिला, घरात चारचाकी असलेल्या 1.6 लाख महिला आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या 7.7 लाख महिलांचा समावेश आहे. शिवाय 2,652 महिला सरकारी कर्मचारी असल्यामुळे देखील वगळल्या गेल्या आहेत.
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना – या मुलींना शिक्षणासाठी मिळणार आर्थिक मदत
आजपर्यंत सुमारे 19 लाख महिलांचे अर्ज या योजनेतून बाद करण्यात आले असून त्यांना मिळणारा 1500 रुपयांचा हप्ता थांबवण्यात आलेला आहे. यामुळे अनेक महिलांचे अर्थसंकल्प कोलमडले आहेत.
पुढचा हप्ता कधी?
जुलै महिन्याचा हप्ता अजूनही अनेकांच्या खात्यात आलेला नाही. मात्र मीडिया रिपोर्ट्सनुसार हा हप्ता जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे 5 ऑगस्ट 2025 पर्यंत खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.
