Ladki Bahin Yojana Installment Not Received : नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा (Ladki Bahin Yojana) जून महिन्याचा हप्ता अद्याप काही महिलांच्या बँक खात्यात जमा झालेला नसेल, तर काळजी करण्याची गरज नाही. योजनेच्या निधी वितरणाची प्रक्रिया सुरू आहे आणि यासंदर्भात महत्त्वाचे अपडेट देण्यात आले आहे.
वितरण प्रक्रिया आणि विलंबाचे कारण
जून महिन्याचा हप्ता ५ जुलै २०२५ रोजी वितरित होण्यास सुरूवात झाली. मात्र ६ जुलै रोजी रविवारची सुट्टी असल्यामुळे बँक व्यवहार बंद होते. त्यामुळे काही लाभार्थी महिलांना हप्ता मिळण्यास थोडा विलंब झाला आहे.
घरकुल योजना : आपल्या गावची घरकुल यादी पहा मोबाईलवर , येथे चेक करा
कधी जमा होतील पैसे
ज्या महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहेत आणि ज्यांना यापूर्वीचे हप्ते वेळेवर मिळाले आहेत, त्यांना जून महिन्याचा हप्ता नक्कीच मिळणार आहे. महिला व बालविकास राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या माहितीनुसार, ८ जुलैच्या रात्रीपर्यंत बहुतेक पात्र महिलांच्या खात्यात रक्कम जमा होईल. आज ७ जुलै किंवा उद्या ८ जुलैच्या रात्रीपर्यंत रक्कम खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.
सध्या सुमारे ७० टक्के पात्र महिलांच्या खात्यात हप्ता जमा झाला आहे. उर्वरित ३० टक्के महिलांना रक्कम मिळण्याची प्रक्रिया सुरू आहे. बँक सुट्टीमुळे विलंब झाला असला तरी उर्वरित महिलांच्या खात्यात लवकरच हप्ता जमा होईल.
💰 गरीब कुटुंबांना या योजनेत मिळणार थेट ₹30,000 – संधी गमावू नका, सविस्तर माहिती जाणून घ्या!
महिलांनी काय करावे
पात्र महिलांनी घाई अथवा चिंता करण्याची गरज नाही. पुढील एक ते दोन दिवसांत तुमच्या खात्यात रक्कम जमा होईल. खात्यातील शिल्लक तपासण्यासाठी पासबुक अपडेट करावे किंवा बँकेचे मोबाईल अॅप किंवा नेट बँकिंगचा वापर करावा. शंका असल्यास संबंधित बँकेच्या ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क साधावा.
अधिकृत संकेतस्थळ
योजनेविषयी अधिक माहितीसाठी लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
https://ladakibahin.maharashtra.gov.in
