Ladki Bahin Yojana GR : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जुलै 2025 महिन्याचा ₹1500 चा हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यावर लवकरच जमा होणार आहे. शासनाने 2,984 कोटींचा निधी वितरित केला आहे. अपात्र ठरलेल्या 26.34 लाख महिलांचा लाभ तात्पुरता स्थगित करण्यात आला असून पात्रतेची पुन्हा तपासणी सुरू आहे.
मुंबई | प्रतिनिधी: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राबवण्यात येणारी महत्वाकांक्षी योजना असून, दर महिन्याला पात्र महिलांच्या खात्यात ₹1500 चा थेट निधी जमा केला जातो.
योजनेअंतर्गत जुलै 2025 महिन्याचा हप्ता लवकरच जमा होणार असल्याची अधिकृत माहिती महिला व बालविकास विभागाने दिली आहे.
या महिलांना मिळणार आवश्यक वस्तू आणि साहित्य मोफत , १००% अनुदानावर लाभ
राज्य सरकारने यासाठी 2,984 कोटी रुपयांचा निधी 30 जुलै रोजी वितरित केला असून, पुढील 2 ते 3 दिवसांत रक्कम लाभार्थींच्या खात्यावर जमा होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
26.34 लाख अपात्र लाभार्थ्यांचा लाभ स्थगित – तपासणी सुरू
या योजनेत अपात्र अर्जदारांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग असल्याची माहिती तंत्रज्ञान विभागाने सादर केली.
26.34 लाख महिलांनी अयोग्य माहिती देऊन लाभ घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
यामध्ये—
- एकाच कुटुंबातील एकापेक्षा अधिक महिलांनी अर्ज केला
- पुरुषांनी महिला म्हणून अर्ज केले
- एकाच लाभार्थ्याने एकापेक्षा अधिक योजना निवडल्या
अशा प्रकारांचा समावेश आहे.
महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, “या 26.34 लाख अपात्र लाभार्थ्यांचा लाभ जून 2025 पासून तात्पुरता स्थगित करण्यात आला आहे. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांकडून शहानिशा होऊन पात्र ठरलेल्या महिलांना पुढे हप्ता पुन्हा सुरू करण्यात येईल.”
शेतकऱ्यांसाठी 200 लिटर प्रतिदिन क्षमतेचा सोलर वॉटर हिटर – 75% अनुदानावर उपलब्ध
2.25 कोटी महिलांना मिळणार हप्ता – लाभ सुलभतेने
ज्या महिला पात्र आहेत आणि ज्यांचा लाभ सुरु आहे, त्यांना जुलै महिन्याचा ₹1500 चा हप्ता लवकरच त्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा होणार आहे.
योजना जुलै 2024 मध्ये सुरू करण्यात आली असून, आतापर्यंत 12 हप्ते वितरित झाले आहेत.
महायुती सरकारने या योजनेसाठी एकूण 28,290 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
लाभार्थ्यांनी आपले eKYC, बँक खाते आणि आधार क्रमांक अद्ययावत ठेवणे अत्यावश्यक आहे. तसे न केल्यास हप्ता रोखला जाऊ शकतो.
30 जूनचा GR पाहण्यासाठी येथे क्लिक करा
स्थिती कशी तपासाल?
लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळतो आहे की नाही हे तपासण्यासाठी https://ladakibahin.maharashtra.gov.in/ या पोर्टलवर किंवा संबंधित ग्रामसेवक / तलाठी कार्यालयात चौकशी करता येते.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महिलांना आर्थिक स्वातंत्र्य देणारी योजना ठरत आहे. अपात्र लाभार्थ्यांवर कारवाई करून शासन पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न करत आहे. जुलै हप्ता लवकरच जमा होणार असून, पात्र महिलांनी आवश्यक कागदपत्रे तपासून ठेवावीत, हेच या परिस्थितीतील शहाणपणाचे पाऊल ठरेल.
