Ladki Bahin Yojana August Installment Update : लाडकी बहीण योजनेचा जुलैचा हप्ता ९ ऑगस्ट रोजी रक्षाबंधनच्या दिवशी जमा होणार आहे. मात्र ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती अद्याप जाहीर झालेली नाही. अंदाजानुसार हा हप्ता महिन्याच्या अखेरीस मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान ४२ लाख महिला योजनेतून अपात्र ठरल्या आहेत.
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही योजना महाराष्ट्रात महिलांसाठी सुरू करण्यात आलेली एक महत्वाकांक्षी उपक्रम आहे. ही योजना सुरू झाल्यापासून सातत्याने चर्चेत राहिली आहे. एकीकडे गरजू महिलांना थेट बँक खात्यात आर्थिक मदत दिली जात असताना, दुसरीकडे अनेकदा हप्त्यांचे वितरण वेळेवर न झाल्याने महिलांमध्ये नाराजीचं वातावरण पाहायला मिळालं आहे.
मत्स्यपालन योजना : या योजनेद्वारे शेतकऱ्यांना मिळणार 75% ते 85% पर्यंत अनुदान , असा करा अर्ज
योजनेअंतर्गत जुलै महिन्याचा हप्ता नेहमीप्रमाणे वेळेवर जमा न होता, तो ९ ऑगस्ट २०२५ रोजी म्हणजेच रक्षाबंधनच्या दिवशी मिळणार आहे. या हप्त्यासह महिलांना उत्सवाचा खास आर्थिक हातभार मिळणार आहे. मात्र ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याबाबत सरकारकडून कोणताही अधिकृत खुलासा झालेला नाही. दर महिन्याला शेवटच्या आठवड्यात पैसे जमा होण्याची पार्श्वभूमी पाहता, ऑगस्टचा हप्ता २८ ते ३१ ऑगस्ट दरम्यान येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दुसरीकडे, योजनेत अपात्र ठरलेल्या महिलांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आतापर्यंत सुमारे ४२ लाख महिलांना योजनेतून वगळण्यात आले असून त्यांना पुढे हप्ते मिळणार नाहीत. यामध्ये २.५ लाख रुपयांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असलेल्या महिला, शासकीय कर्मचारी आणि इतर सरकारी योजनांचा लाभ घेतलेल्या महिलांचा समावेश आहे. ही प्रक्रिया पारदर्शकपणे करण्यात येत असून जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून पडताळणीही सुरू आहे.
घरकुल योजना : आपल्या गावची घरकुल यादी पहा मोबाईलवर , येथे चेक करा
या निर्णयामुळे योजनेचा लाभ खरोखर गरजू महिलांपर्यंत पोहोचवण्याचा सरकारचा प्रयत्न दिसून येतो. मात्र लाभ घेणाऱ्या महिलांनी योजनेच्या निकषांनुसारच अर्ज करावा आणि चुकीची माहिती देऊन अर्ज केल्यास त्यांचे अर्ज बाद करण्यात येतील, अशी स्पष्ट चेतावणी देखील अधिकाऱ्यांनी दिली आहे.
