CLOSE AD

लाडकी बहीण योजना : सप्टेंबरचा ₹१,५०० हप्ता जमा; नवीन यादी पहा आत्ताच!

Ladki Bahin September : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! सप्टेंबर २०२५ महिन्याचा ₹१,५०० चा हप्ता आजपासून थेट खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. सरकारने लाभार्थ्यांसाठी नवीन यादी जाहीर केली आहे. ज्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे, त्या महिलांना हप्ता मिळणार आहे.

महाराष्ट्रातील महिलांसाठी सरकारने राबवलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कारण, सप्टेंबर २०२५ महिन्याचा हप्ता आजपासून जमा होण्यास सुरुवात झाली आहे. अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले असून, इतर लाभार्थ्यांना पुढील काही दिवसांत रक्कम मिळणार आहे. सरकारने याचबरोबर नवीन लाभार्थी यादी देखील प्रसिद्ध केली आहे.

संजय गांधी निराधार अनुदान योजना : सप्टेंबर २०२५ हप्ता फेल, लाभार्थ्यांची यादी जाहीर

नवीन लाभार्थी यादी जाहीर

महिला व बालविकास विभागाने सप्टेंबर महिन्याची नवीन लाभार्थी यादी जारी केली आहे. या यादीत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेल्या महिलांचा समावेश करण्यात आला आहे. लाभार्थ्यांनी आपले नाव तपासण्यासाठी अधिकृत वेबसाइट ladakibahin.maharashtra.gov.in ला भेट द्यावी. वेबसाइटवर आधार क्रमांक प्रविष्ट करून आपले नाव यादीत आहे का हे पाहता येईल. यावेळी सरकारने स्पष्ट केले आहे की, ज्यांनी ई-केवायसी केली नाही त्यांचा हप्ता थांबवण्यात येईल.

हप्ता जमा होण्यास सुरुवात

सप्टेंबर महिन्याचा ₹१,५०० चा हप्ता आजपासून थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होतो आहे. सरकारने महिला व बालविकास विभागाकडे ₹४१० कोटी रुपयांचा निधी वर्ग केला आहे. हा हप्ता एकाच टप्प्यात संपूर्ण राज्यातील पात्र महिलांना दिला जाणार आहे. योजनेचा उद्देश महिलांना आर्थिक स्थैर्य देणे आणि त्यांच्या स्वावलंबनात हातभार लावणे हा आहे.

या नागरिकांच्या वारसाला मिळणार ₹5,00,000 आर्थिक सहाय्य , असा करा अर्ज

ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक

लाडकी बहीण योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी सरकारने ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य केली आहे.
अनेक ठिकाणी एकाच कुटुंबातील तीन महिलांनी हप्ता घेतल्याचे आढळले होते. त्यामुळे आता केवळ एकाच पात्र महिलेला हप्ता मिळणार आहे. ई-केवायसी पूर्ण केल्याशिवाय सप्टेंबर आणि पुढील महिन्यांचे हप्ते थांबणार आहेत. महिलांनी आपल्या आधार क्रमांकाद्वारे ladakibahin.maharashtra.gov.in वर ई-केवायसी पूर्ण करावी.

लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment