High Rain Alert : नमस्कार मित्रांनो आज महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पावसाने जोर धरण्याची शक्यता आहे. विशेषता कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने मुसळधार ते अतीमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
कोकणात मुसळधार पावसाची शक्यता
कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार ते अतीमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. या भागांसाठी हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर मुंबई, ठाणे आणि पालघर या ठिकाणी हलक्यापासून मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता असून, यासाठी येलो अलर्ट देण्यात आला आहे.
राज्य सरकारची मोठी घोषणा : शेळ्या व मेंढ्या खरेदी योजना , ऑनलाईन अर्जप्रक्रिया सुरु
विदर्भात काही भागांत पाऊस मुसळधार होण्याचा इशारा
विदर्भातील अमरावती, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या जिल्ह्यांना विशेष सतर्कतेचा सल्ला देण्यात आला आहे. नागपूर, भंडारा, गोंदिया, बुलढाणा, अकोला आणि वाशीम या जिल्ह्यांमध्येही पाऊस होण्याची शक्यता असून, याठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मराठवाड्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस
मराठवाड्यातील नांदेड, लातूर, बीड, परभणी, हिंगोली, जालना आणि संभाजीनगर जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. धाराशिव जिल्ह्याच्या काही भागांत तुरळक पावसाची शक्यता आहे.
तार कुंपण योजना 2025 : शेतकऱ्यांसाठी 90% अनुदानाची मोठी संधी!
पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथा भागांमध्ये आज मुसळधार ते अतीमुसळधार पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे या भागांसाठी ऑरेंज अलर्ट लागू करण्यात आला आहे. दुसरीकडे, नाशिक, धुळे, नंदुरबार आणि जळगाव या जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता असल्याने येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. अहिल्यानगरमध्येही हलक्यापासून मध्यम पावसाचा अंदाज आहे. सोलापूर आणि सांगली जिल्ह्यांसाठी मात्र सध्या कोणताही अलर्ट जारी केलेला नाही.
शेतकऱ्यांसाठी आणि नागरिकांसाठी सूचना
पावसाचा इशारा लक्षात घेता, नदीकिनाऱ्यांवर, डोंगराळ भागात आणि निचऱ्याच्या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी. हवामानाची स्थिती ओळखून शालेय व इतर शासकीय संस्थांनी निर्णय घ्यावेत. गरज नसल्यास घराबाहेर जाणे टाळा आणि सुरक्षिततेला प्राधान्य द्या.
Disclaimer — ही माहिती भारतीय हवामान खात्याच्या अंदाजावर आधारित आहे. हवामानात वेळोवेळी बदल होऊ शकतो, त्यामुळे अधिकृत हवामान संकेतस्थळे आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांकडे लक्ष द्या. या माहितीचा वापर वाचकांच्या जबाबदारीवर आधारित आहे.
