High Rain Alert Vidarbha : नमस्कार मित्रांनो सध्या संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पावसाने थैमान घातले असून, राज्यातील अनेक भागांत हवामान विभागाने अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या चारही विभागांमध्ये पावसाचा जोर कायम असून, विविध ठिकाणी हाय आणि रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
विदर्भात पावसाचा प्रकोप नागपूरमध्ये ऑरेंज अलर्ट
विदर्भात विशेषता नागपूर जिल्ह्यात पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. जिल्हाधिकारी विपीन ईटकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूरसाठी आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. संभाव्य आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेता लष्कराची मदत घेण्याची तयारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
लाडकी बहीण योजना : बापरे ! हजारो लाडक्या बहिणी अपात्र ….. लगेच यादीत नाव चेक करा
SDRF आणि NDRF च्या तुकड्या सज्ज ठेवण्यात आल्या असून, आतापर्यंत 40 नागरिकांचे बचावकार्य करण्यात आले आहे. सततच्या पावसामुळे नागपूरमधील शाळा आज बंद ठेवण्यात आल्या असून, नागरिकांना अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पूर्व विदर्भात हलक्या ते मध्यम सरी तर काही जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा आहे.
कोकणात रेड अलर्ट समुद्रकिनाऱ्यांपासून दूर राहण्याचे आवाहन
कोकण विभागात देखील हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. रायगड, रत्नागिरी आणि मुंबईसह कोकणातील अनेक भागांत अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. समुद्रकिनाऱ्यांवर उच्च तडाख्याचे लाटांचे अंदाज असल्याने नागरिकांना समुद्रकिनारी न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
तरुणांना मिळणार 15 लाख रुपयापर्यंत बिनव्याजी कर्ज , पहा हि योजना
मध्य महाराष्ट्रात घाटमाथ्यावर पावसाचा जोर
मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. घाटमाथ्यांवर अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आल्याने दक्षतेचा इशारा दिला आहे.
मराठवाड्यातही मुसळधार पावसाचा अंदाज
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अनुभव येण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
राज्यातील हवामानाची परिस्थिती गंभीर आहे. नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि सुरक्षित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
