CLOSE AD

पंजाबराव डख हवामान अंदाज : अवघ्या काही तासांत या जिल्ह्यात पडणार मुसळधार पाऊस

High Rain Alert Few Hours : नमस्कार मित्रांनो मॉन्सून सक्रिय झाल्याने राज्यात सर्वदूर कमीअधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली आहे. काही भागांत हलकासा पाऊस झाला असला तरी, अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार सरी कोसळत असून हवामान विभागाने काही भागांसाठी दक्षतेचे इशारे दिले आहेत.

विदर्भ व कोकणात ऑरेंज अलर्ट

आज विदर्भातील अमरावती, वाशीम, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांत जोरदार पावसाचा अंदाज आहे. तसेच कोकणातील रत्नागिरी आणि पश्चिम महाराष्ट्रातील सातारा घाटमाथ्यावरही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागांमध्ये हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

लाडकी बहीण योजना : बापरे ! हजारो लाडक्या बहिणी अपात्र ….. लगेच यादीत नाव चेक करा

कोकण, घाटमाथा व मराठवाड्यात येलो अलर्ट

राज्याच्या इतर भागांमध्येही पावसाचा जोर कमी अधिक राहणार असून पालघर, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, पुणे, नाशिक, कोल्हापूर या जिल्ह्यांच्या घाटमाथ्यांवर तसेच मराठवाड्यातील हिंगोली आणि नांदेड येथे येलो अलर्ट देण्यात आला आहे.

विजांसह पावसाचा इशारा

उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. नंदूरबार, धुळे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी आणि अकोला या जिल्ह्यांत येलो अलर्ट देण्यात आला आहे.

तरुणांना मिळणार 15 लाख रुपयापर्यंत बिनव्याजी कर्ज , पहा हि योजना

हवामानातील बदलांची पार्श्वभूमी

दक्षिण पश्चिम बंगाल आणि आसपासच्या भागात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून ही प्रणाली झारखंड आणि छत्तीसगडकडे सरकण्याची शक्यता आहे. मॉन्सूनचा कमी दाबाचा पट्टा सध्या गंगानगर, सिरसा, मेरठ, वाराणसी, दाल्टोंगंज, पुरुलिया आणि बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. तसेच आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि महाराष्ट्रात पूर्वेकडून जोरदार उष्ण कटिबंधीय वारे वाहत आहेत. दक्षिण गुजरात व दक्षिण कर्नाटक किनारपट्टीच्या समांतर कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. या सर्व प्रणाली एकत्रितपणे राज्यात पावसाचा जोर वाढविण्यास कारणीभूत ठरत आहेत.

काही ठिकाणी अतिवृष्टी, काही ठिकाणी उष्णता

कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर मोठ्या प्रमाणात पावसाची नोंद झाली आहे. २४ तासांत नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे सर्वाधिक १७० मिमी पावसाची नोंद झाली. दुसरीकडे, सोलापूरमध्ये पावसाने ओढ दिल्याने तेथे राज्यातील उच्चांकी ३३.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

Leave a Comment