Heavy Rain Update : मंडळी हवामान विभागाच्या माहितीनुसार सध्या संपूर्ण देशभरात मान्सून सक्रिय झाला आहे. येत्या 9 जुलैपर्यंत अनेक राज्यांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबई शहर आणि उपनगरात पुढील 24 तासांमध्ये आकाश सामान्यता ढगाळ राहील. काही ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा
कोकणातील अनेक भागांमध्ये जोरदार पावसामुळे नद्या-नाले ओसंडून वाहू लागले आहेत. नागपूरला मुसळधार पावसाने झोडपले आहे, तर विदर्भातील काही भागांत पावसाची तुरळक हजेरी लागली आहे. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर पुन्हा वाढणार असल्यामुळे हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
महाराष्ट्रातील महिलांना मिळणार 90% अनुदानावर पिठाची गिरणी , असा करा अर्ज
काही जिल्ह्यांना अलर्ट
रायगड, रत्नागिरी, पुणे घाटमाथा आणि सातारा जिल्ह्यांसाठी जोरदार पावसाचा अंदाज वर्तवून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. उर्वरित महाराष्ट्रात ढगाळ हवामान राहून हलक्या पावसाची शक्यता आहे.
6 जुलैपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता
सध्या राज्यभर हलक्यापासून मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी सुरू आहेत. मात्र 6 जुलैपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
लाडकी बहिण योजना : लाडक्या बहिणींना महत्त्वाची बातमी , जाणून घ्या सविस्तर माहिती
पश्चिम, दक्षिण आणि ईशान्य भारतातही पावसाचा इशारा
महाराष्ट्र, गोवा, गुजरात, कोकण आणि सौराष्ट्रात 9 जुलैपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे. दक्षिण भारतातील कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, तेलंगणा, केरळ आणि लक्षद्वीपमध्ये अनेक भागांत मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. ईशान्य भारतातील अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर आणि मिझोराममध्ये मध्यम पावसाची शक्यता आहे.
धाराशिव जिल्ह्यात शेतकऱ्यांवर नवे संकट
धाराशिव जिल्ह्यात शेतकरी मोठ्या संकटाला सामोरे जात आहेत. मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसानंतर आता पंधरा दिवसांपासून मान्सूनच्या पावसाने पाठ फिरवली आहे. परिणामी, जिल्ह्यातील सुमारे तीन लाख हेक्टरवरील खरीप पिके धोक्यात आली आहेत. विशेषता सोयाबीन पिकाला पाण्याअभावी फटका बसत आहे. लवकरच पाऊस न झाल्यास शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागण्याची भीती आहे.
मागेल त्याला शेततळे योजना : ऑनलाईन अर्ज सुरु , जाणून घ्या सविस्तर माहिती
अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा शहराला पाणीपुरवठा करणारा शक्कर तलाव कोरडा पडला आहे. त्यामुळे शहरात दोन दिवसाआड पाणीपुरवठा होतो आहे. या परिस्थितीमुळे पर्यटन व्यवसायावरही परिणाम झाला असून तलावातील बोटिंग बंद करण्यात आले आहे. त्यामुळे पर्यटक निराश होत आहेत आणि चिखलदऱ्यावर पाणीसंकट गडद होत चालले आहे.