CLOSE AD

अण्णाभाऊ साठे योजनेतून मिळवा 7 लाख रुपये , पहा सविस्तर माहिती

Annabhau Sathe Yojana : मंडळी मातंग समाजातील युवक-युवतींसाठी महाराष्ट्र शासनाने दिलासा देणारी अण्णा भाऊ साठे कर्ज योजना सुरू केली आहे. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळामार्फत 2024-25 या आर्थिक वर्षात विविध कर्ज योजना राबवण्यात येत आहेत. या योजनांचा उद्देश शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक प्रगती साधणे आहे. सध्या या योजनांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे.

या महिलांना मिळणार मिनी पिठाची गिरणी – 100% अनुदानासह स्वरोजगाराची संधी!

योजनांचे प्रकार आणि कर्ज मर्यादा

या योजनांत तीन प्रमुख प्रकार आहेत – बीजभांडवल योजना, थेट कर्ज योजना आणि अनुदान योजना. बीजभांडवल योजनेत कर्ज मर्यादा वाढवून ती आता 7 लाख रुपये करण्यात आली आहे. पूर्वी ही मर्यादा 5 लाख रुपये होती. या योजनेत बँकेचा सहभाग 75 टक्क्यांवरून 50 टक्के करण्यात आला असून महामंडळाचा सहभाग 45 टक्के झाला आहे. त्यामुळे बँकेकडून कर्ज मिळवणे अधिक सोपे झाले आहे.

थेट कर्ज योजनेत 1 लाख रुपये पर्यंत कर्ज दिले जाते. यात 85 हजार रुपये महामंडळाकडून कर्ज, 10 हजार रुपये अनुदान आणि 5 हजार रुपये लाभार्थ्याचा सहभाग असतो.

👩‍💼 बिमा सखी योजनेअंतर्गत महिलांना मिळणार दरमहा ₹7,000 – महिलांसाठी नव्या संधीचा मार्ग!

अनुदान योजनेत लघु प्रकल्पांसाठी 50 हजार रुपये पर्यंतची मदत दिली जाते.

पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

या योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्जदार 18 ते 50 वर्षे वयोगटातील असावा. अर्जदार मुंबई शहर किंवा उपनगरातील मातंग समाज किंवा तत्सम 12 पोटजातींपैकी असावा.

इच्छुक अर्जदारांनी आवश्यक कागदपत्रांसह गृहनिर्माण भवन, खोली क्र. 33, बांद्रा (पूर्व), मुंबई – 400051 या पत्त्यावर संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी 022-35424395 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येईल.

स्कुटी खरेदी अनुदान योजना : या व्यक्तींना स्कुटी खरेदीसाठी मिळणार अनुदान , असा करा अर्ज

योजनेचा लाभ

गेल्या दोन आर्थिक वर्षांत 1166 लाभार्थ्यांना सुमारे 9.91 कोटी रुपये निधी वितरित करण्यात आला आहे. त्यामुळे या योजना मातंग समाजातील युवक-युवतींसाठी आर्थिक स्वावलंबन साधण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरत आहेत.

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा



फॉर्म डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

दुसरा फॉर्म डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment