CLOSE AD

शेतकरी, शेतमजूर व बचतगटांसाठी सुधारित कृषी अवजार पुरवठा योजना – ५०% अनुदानावर ऑनलाईन अर्ज सुरु

Agricultural Implement Supply Scheme : ठाणे जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत शेतकरी, शेतमजूर व बचतगट यांना आधुनिक कृषी यंत्रांचा पुरवठा ५०% अनुदानावर केला जात आहे. ही योजना शेतमालाचे उत्पादन व कार्यक्षमता वाढवण्यासाठी, मजुरीवरील खर्च कमी करण्यासाठी आणि वेळेवर शेती कामे पूर्ण होण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे.

ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत 24 जुलै 2025 पासून 20 ऑगस्ट 2025 पर्यंत आहे. पात्र लाभार्थ्यांना स्प्रेयर, सुतार अवजारे, शेती फवारणी पंप, कंद खणणारे अवजारे, आंतरमशागत यंत्रे यासारखी सुधारित आधुनिक यंत्रसामग्री अनुदानावर उपलब्ध करून दिली जाणार आहे.

गाय गोठा अनुदान योजने अंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार 77,000 रुपये , असा करा अर्ज

ही योजना केवळ ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी लागू आहे. अर्ज करण्यासाठी वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी आवश्यक आहे. अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्ज पूर्ण करावा लागतो.

योजनेचा उद्देश

या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना तांत्रिक दृष्टिकोनातून सक्षम बनवणे व शेतीतील यांत्रिकीकरण वाढवणे. श्रमबळाची टंचाई आणि वाढता खर्च लक्षात घेता, सुधारित अवजारांनी शेती कामे सुलभ व वेळेवर पूर्ण होतात, तसेच उत्पादनात वाढ होते.

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना – ₹30 लाखांचा निधी मंजूर , या शेतकऱ्यांना मिळणार लाभ

पात्रता निकष कोणते?

  • अर्जदार ठाणे जिल्ह्यातील रहिवासी असावा
  • तो शेतकरी, शेतमजूर किंवा महिला बचतगट सदस्य असावा
  • किमान ०.२५ हेक्टर शेतजमीन असलेला शेतकरी पात्र
  • मागील दोन वर्षांत योजनेचा लाभ न घेतलेला असावा
  • सर्व आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक

अनुदानाचा लाभ काय?

  • उपलब्ध यंत्रसामग्रीवर ५०% अनुदान मिळते
  • उर्वरित ५०% रक्कम लाभार्थ्यांनी स्वतः भरावी लागते
  • यंत्रसामग्रीचे वितरण अधिकृत विक्रेत्यांमार्फत
  • यंत्र खरेदीनंतर DBT (Direct Benefit Transfer) द्वारे रक्कम खात्यात जमा

आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • ७/१२ उतारा (शेतकरीसाठी)
  • शेतकरी / शेतमजूर प्रमाणपत्र
  • बचतगट नोंदणी प्रमाणपत्र (महिला बचतगटासाठी)
  • बँक पासबुक (IFSC कोडसह)
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • पासपोर्ट साईज फोटो

👇👇👇👇👇👇👇

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

👆👆👆👆👆👆👆

योजनेचे फायदे

  • आधुनिक यंत्रे वापरल्यामुळे शेतीत कार्यक्षमता वाढते
  • मजुरीवरील खर्च कमी होतो
  • वेळ व श्रम वाचतो
  • पिकांची गुणवत्ता सुधारते
  • आर्थिकदृष्ट्या अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी फायदेशीर

Leave a Comment