CLOSE AD

राज्यातील 18 हजार शाळा बंद होणार ? जाणून घ्या सविस्तर माहिती

18000 School Closed : मित्रांनो जून 2025 मध्ये शैक्षणिक वर्ष 2025–26 ला सुरुवात झाली असून 15 जूनपासून राज्यातील बहुतेक शाळा सुरू झाल्या आहेत. मात्र यंदाच्या नव्या शैक्षणिक वर्षात अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या घटली आहे. काही शाळांमध्ये तर ही संख्या २० पेक्षाही कमी असल्याने, अशा शाळा बंद होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

शाळा बंद होणार नाहीत – सरकारची ग्वाही

या पार्श्वभूमीवर मुंबईत सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात यासंदर्भात सरकारने आपली अधिकृत भूमिका स्पष्ट केली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितले की, २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद केल्या जाणार नाहीत. या शाळा सुरू ठेवण्यात येतील आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणात कुठलाही अडथळा येऊ दिला जाणार नाही.

सरकार देत आहे 50,000 रुपयापर्यंत कर्ज , असा करा ऑनलाईन अर्ज

शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी देखील या मुद्द्यावर विधानसभेत माहिती देताना स्पष्ट केले की, आतापर्यंत केवळ कमी पटसंख्येच्या आधारे कुठलीही शाळा बंद करण्यात आलेली नाही.

१८ हजार शाळांमध्ये कमी पटसंख्या

राज्यात सध्या सुमारे १ लाख ८ हजार शाळा आहेत. यापैकी सुमारे १८,००० शाळांमध्ये २० पेक्षा कमी विद्यार्थी आहेत. यामुळे या शाळा बंद होणार का, अशी चिंता पालकांमध्ये व शिक्षकांमध्ये निर्माण झाली होती. मात्र सरकारने आश्वासन दिले आहे की, या शाळा सुरू ठेवण्यात येणार असून शिक्षणात खंड येऊ दिला जाणार नाही.

🌾 डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना मिळणार ७५% पर्यंत अनुदान

शिक्षकांचे समायोजन सुरू

विधानपरिषद आमदार विक्रम काळे यांनी या विषयावर लक्षवेधी सूचना मांडली होती. यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले की, ज्या भागांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे, तिथे अतिरिक्त शिक्षकांचे योग्य रीतीने समायोजन करण्यात येत आहे.

राज्यातील १८,००० शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या कमी असली तरी त्या शाळा बंद होणार नाहीत, असे सरकारने स्पष्ट केले आहे. शिक्षणाचा अधिकार अबाधित ठेवत, विद्यार्थ्यांसाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, अशी ग्वाही सरकारने दिली आहे.

Leave a Comment